rape 
देश

आईच्या मित्राकडून विश्वासघात, १४ वर्षीय मुलीवर केला बलात्कार

स्कुटर शिकवण्यासाठी मुलीला सोबत घेऊन गेला होता.

दीनानाथ परब

अहमदाबाद: स्कुटर शिकवण्याच्या बहाण्याने ४० वर्षीय आरोपीने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (rape) केला. गुजरातच्या (Gujarat) माकारबा गावात ही धक्कादायदक घटना घडली आहे. आरोपी पीडीत मुलीच्या आईचा मित्र आहे. नारोल (Narol) येथे राहणाऱ्या पीडीत मुलीच्या आईने आरोपी मित्राविरोधात सारखेज पोलीस (Sarkhej police) ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. माकारबा गावातील एका निर्जन घरामध्ये रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आरोपी घोडासार येथे रहायला असून महिला त्याला आधीपासून ओळखत होती. मागच्या पाच वर्षांपासून त्याचे घरी येणे-जाणे होते, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. रविवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास आरोपी महिलेच्या घरी आला व त्याने महिलेला तिच्या मुलीला स्कूटर चालवायला शिकवतो असे सांगितले.

संध्याकाळी ७.३० वाजता त्याने मुलीला घरी आणून सोडले. त्यावेळी मुलगी थेट रडायलाच लागली. आईने तिला रडण्याचे कारण विचारले, त्यावेळी तिने आरोपीने माकारबा गावातील एका निर्जन घरामध्ये बलात्कार केल्याचे सांगितले.

"आरोपीने सुरुवातीला माझ्या घराजवळ स्कूटर चालवायला शिकवली. त्यानंतर त्याने मुलीला मागच्या सीटवर बसवले व निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला" महिलेने पोलीस तक्रारीत हे म्हटलं आहे. काय घडलं त्याबद्दल आईला सांगितलं, तर वाईट परिणाम भोगावे लागतील, असं आरोपीने धमकावल्याचं मुलीने तिच्या आईला सांगितलं. महिला मुलीला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेली तिथे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Raj Thackeray : गणेशोत्सवात दंगलींचा कट? ‘मुंबईत झलक दिसली’; राज ठाकरेंचा खळबळजनक इशारा

Vaibhav Sooryavanshi ची फटकेबाजी पाहून तिलक वर्मा वैतागला; १५ वर्षाच्या पोराला उगाच भिडला, अम्पायरची पळापळ... Video

Pune Bengaluru Highway: कारला आग लागली अन् महामार्ग ठप्प; आनेवाडीजवळ ५ किमी वाहनांच्या रांगा, अग्निशामक वाहनावर संताप

Marathi News Live Updates : चिंचवड सब स्टेशन इथं ट्रान्सफर्मरला आग, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडीसह रावेतमध्ये विजपुरवठा खंडित

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

SCROLL FOR NEXT