esakal | Solapur : पोलिस ट्रेनिंगला गेलीस, तर नांदवणार नाही! दोन विवाह केलेल्या पतीची धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस ट्रेनिंगला गेलीस, तर नांदवणार नाही! दोन विवाह केलेल्या पतीची धमकी

विवाहाच्या दहा दिवसांनंतर पतीसह सासरच्यांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याची फिर्याद नीता मोरे यांनी जेलरोड पोलिसांत दिली आहे.

पोलिस ट्रेनिंगला गेलीस तर नांदवणार नाही! दोन विवाह केलेल्या पतीची धमकी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पोलिस (Police) मुख्यालयातील नीता ऊर्फ रेणुका नवनाथ मोरे यांचा 28 जानेवारी 2012 रोजी नवनाथ याच्याशी विवाह झाला. विवाहाच्या दहा दिवसांनंतर 2013 पर्यंत सासऱ्याच्या घरी ममदापूर (ता. बार्शी) या ठिकाणी पतीसह सासरच्यांनी मानसिक व शारीरिक छळ (Persecution) केल्याची फिर्याद (Crime) नीता मोरे यांनी जेलरोड पोलिसांत दिली आहे. त्यांना पोलिस भरतीचा कॉल आल्यानंतर सासरच्यांनी ट्रेनिंगला गेल्यास नांदवणार नाही, अशी धमकी दिली, असेही फिर्यादीत नमूद आहे.

लग्नात हुंडा कमी दिला, चारित्र्यावर संशय घेऊन त्यांनी त्रास दिला. पहिला विवाह झाल्यानंतरही त्याने दुसरा विवाह केला. माझा विवाह ज्योती ईश्‍वर सर्जे हिच्यासोबत झाला असून मला दोन मुले आहेत. पुन्हा तू इथे आल्यास तुला खल्लास करेन, अशी धमकीही पतीने दिल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पती नवनाथ बाबूराव मोरे, निलावती बाबूराव मोरे व बाबूराव बलभीम मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बादोले हे करीत आहेत.

हेही वाचा: चिमुकलीसह विवाहितेचा खून! आरोपींना जन्मठेप की फाशी? आज फैसला

मागील भांडणातून तरुणाला मारहाण

येथील सिंदीखानाजवळील कन्ना चौकातील लक्ष्मीकांत बिंगी याने मागील भांडणाचा राग मनात धरून लोखंडी पट्टीच्या तुकड्याने मारहाण केली. सागर यांच्या दुकानातून कोथिंबीर आणायला जाताना लक्ष्मीकांतने कपाळावर मारून दुखापत केली. पुन्हा इकडे आलास तर तुला बघून घेतो, अशी दमदाटी बिंगी याने केल्याची फिर्याद गणेश वासुदेव धोत्रे याने जोडभावी पेठ पोलिसांत दिली आहे. त्यावरून लक्ष्मीकांत बिंगीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस नाईक मनोहर हे करीत आहेत. तर गणेशने आपल्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शिवीगाळ करून मारहाण केली. लोखंडी पट्टीने हातावर मारून दुखापत केली, अशी फिर्याद बिंगी यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. याचा तपास पोलिस नाईक पाटील हे करीत आहेत.

हेही वाचा: Solapur 'झेडपी अध्यक्षांनी टक्केवारी मागितली !'

पोलिसांबद्दल आक्षेपार्ह मजकूर; व्हॉट्‌सऍप ऍडमिनविरुद्ध गुन्हा

येथील सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन येथील राम सिद्राम गायकवाड याने हिस्टोरी सोलापूर न्यूज नावे व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केला आहे. त्या ग्रुपमध्ये 247 जणांना त्याने समाविष्ट करून घेतले आहे. पोलिस दलातील व्यक्‍तींमध्ये उद्देशपूर्वक अप्रीतीची भावना निर्माण होईल, पोलिसांनी आपली कामगिरी थांबवून ठेवावी, या हेतूने त्याने मजकूर तयार करून त्या ग्रुपवर वेळोवेळी टाकला. या कारणास्तव अक्‍कलकोट दक्षिण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप काळे हे पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top