aiadmk dalit mla inter caste marriage stirs controversy as wifes family opposes 
देश

आमदाराने केला 17 वर्षांनी लहान असलेल्या प्रेयसीसोबत विवाह; पण...

वृत्तसंस्था

चेन्नई (तमिळनाडू): एका आमदाराने आपल्यापेक्षा 17 वर्षांनी लहान असलेल्या प्रेयसीसोबत विवाह केला आहे. पण, दोघांचा विवाह जातीमुळे चर्चेत आला असून, मुलीच्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

तामिळनाडूमधील एआयएडीएमके पक्षाचे आमदार ए. प्रभू (वय 36) यांनी प्रेयसी सौंदर्या (वय 19) सोबत विवाह केला आहे. पण, विवाहानंतर सौंदर्याच्या वडिलांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सौंदर्याचे वडील एस. स्वामीनाथन म्हणाले, 'आमदाराने माझ्या मुलीला पळवून नेऊन तिच्याशी विवाह केला आहे. सौंदर्या १९ वर्षांची असल्यामुळे ती अल्पवयीन असतानाच तिच्यासोबत आमदाराने प्रेम केले. आमदार प्रभू हे त्यांच्याच घरात अनेक वर्षांपासून राहत आहेत. प्रभू यांना आपण मुलासारखे मानले. मात्र, त्याने माझा विश्वासघात केला. मी या लग्नासाठी होकार दिलेला नाही. सौंदर्याला फूस लावून लग्न केले आहे. दोघांच्या वयात १७ वर्षांचे अंतर आहे." त्यानंतर प्रभू यांनी आरोप फेटाळून लावताना स्वतःचा सौंदर्या सोबतचा एक व्हिडिओच व्हायरल केला आहे.

आमदार प्रभू यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांपासून आम्ही संपर्कात आलो असून, तेंव्हापासून आमच्या प्रेमसंबंध निर्माण झाले आहेत. शिवाय, व्हिडिओही व्हायरल केला आहे. व्हिडिओमध्ये सांगितले की, 'आमच्या प्रेमसंबंधाला केवळ चार महिने झाले आहेत. मी लग्नासाठी स्वामिनाथन यांची परवानगी मागितली होती. मात्र, त्यांनी नकार दिल्यामुळे आम्हाला नाईलाजाने त्यांना वगळून विवाह करावा लागला. त्यांना राग आल्यामुळे ते थेट घरात घुसले आणि त्यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT