Video: अडीच हजार वर्षापूर्वीची बंद पेटी उघडली अन्...

वृत्तसंस्था
Tuesday, 6 October 2020

इजिप्तमध्ये उत्खननामध्ये वेगवेगळ्या वस्तू मिळताना आढळतात. अडीच हजार वर्षांपूर्वीची बंद पेटी उघडल्यानंतर त्यामध्ये ममी आढळून आली. मिस्त्र येथे पुरातत्व विभागातील कामगारांनी ही प्राचीन ममीची पेटी उघडली असून, संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कैरो (इजिप्त): इजिप्तमध्ये उत्खननामध्ये वेगवेगळ्या वस्तू मिळताना आढळतात. अडीच हजार वर्षांपूर्वीची बंद पेटी उघडल्यानंतर त्यामध्ये ममी आढळून आली. मिस्त्र येथे पुरातत्व विभागातील कामगारांनी ही प्राचीन ममीची पेटी उघडली असून, संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Video: चिमुकल्याने काय केलीय बॅटींग!

मिस्त्र पर्यटन आणि पुरातत्व मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, साककाराच्या पुरातत्व क्षेत्रात दफन विहिरींमध्ये ५९ लाकड्याचा पेट्यांचा शोध घेण्यात आला होता. लाकडाच्या पेट्या अद्यापही चांगल्या स्थितीत होत्या. या पेट्यांमध्ये प्रतिष्ठीत आणि वरिष्ठ नागरिकांच्या मृतदेहांचा समावेश होता. एक पेटी शनिवारी उघड्यात आली. अडीच वर्षांपासून ही पेटी बंद अवस्थेत होती. पेटी उघडल्यानंतर ममी आढळून आली. पर्यटन आणि पुरातत्व मंत्रालयाकडून याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ममी एका दफन कापडात गुंडाळून ठेवण्यात आला होती.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'या वर्षाच्या सुरूवातीला ५६ बंद पेट्या सापडल्या होत्या. त्यातील १२ पेक्षा जास्त पेट्या या साककारा मध्ये उघडण्यात आल्या होत्या. साककारा मिस्त्र येथील विशाल, प्राचीन दफन मैदान आहे.' नॅशनल ज्योग्राफिकच्या अहवालानुसार, 'पॉप संस्कृती आणि लोककथांमध्ये ममीची पेटी उघडल्यानंतर मृत्यू किंवा अभिशाप होतो असे मानले जाते.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the mummy tomb which has been sealed for 2500 years has been opened for the first time