flight 
देश

विमान प्रवासासाठी मार्गदर्शक नियम जाहीर; सेतू ऍप विषयी महत्वाची घोषणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशातील सर्वानाच घरात बंदिस्त केले. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली. याचा जबर फटका अर्थव्यवस्थेला बसला असून, पुन्हा अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारने टप्याटप्याने अंतर्गत सेवा सुविधा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशातील प्रवासी विमान सेवा २५ मे पासून सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र कोरोनाच्या खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. ज्यामध्ये प्रवाशांना आरोग्य सेतू ऍप बंधनकारक करण्यात आले आहे. 

जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर थंडावलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारने टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात काहीशी मुभा देत टाळेबंदीचे नियम शिथिल केले आहेत. त्यानुसारच देशांतर्गत प्रवासासाठी सरकारने हिरवा कंदील दिलेला असून, येत्या २५ मे पासून विमान सेवा सुरु होणार असल्याचे केंद्रीय नागरीक हवाई उड्डयन मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्विटर वरून जाहीर केले. त्यानंतर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) महामारीचे गांभीर्य विचारात घेऊन प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक नियम जाहीर केले आहेत. यानुसार प्रवाशांना आरोग्य सेतू ऍप बंधनकारक असणार आहे. तर १४ वर्षाखालील मुलांना आरोग्य सेतू ऍपमधून मुभा देण्यात आली आहे. तसेच विमानतळावर दाखल होण्यापूर्वी थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य करण्यात आले असून, सामानाचे देखील निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे. आरोग्याच्या समस्या असणारे, वयोवृद्ध आणि गर्भवती स्त्रियांनी शक्यतो प्रवास टाळण्याचे आवाहन नागरीक हवाई उड्डयन मंत्रालयाने आपल्या परिपत्रकात केले आहे. याव्यतिरिक्त प्रवाशांनी तोंडाचा मास्क परिधान करावा, आणि आपल्या प्रवासाच्या दोन तास आधी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. 

दरम्यान याआधीच अडचणीत असणाऱ्या विमान कंपन्यांना कोरोनाच्या टाळेबंदीमुळे अजूनच गर्तेत टाकले आहे. विमान क्षेत्राला याचा मोठा फटका बसला असून बऱ्याच विमान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. त्यामुळे  नागरीक हवाई उड्डयन मंत्रालयाच्या या निर्णयामुळे विमान कंपन्यांना थोडाफार दिलासा मिळाला असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून विमान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी देखील काही नियम पाळण्यास सांगण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT