Amit Shah 
देश

Amit Shah on No Confidence Motion: जनतेच्या प्रश्नांसाठी नव्हे संभ्रमासाठी अविश्वास प्रस्ताव; शहांचं विरोधकांना प्रत्युत्तर

आज राहुल गांधींनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन लोकसभेत केंद्र सरकारला चांगलचं धारेवर धरलं

Amit Ujagare (अमित उजागरे)

Amit Shah on No Confidence Motion: विरोधी पक्षांनी केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर कालपासून चर्चेला सुरुवात झाली आहे. आज या चर्चेचा दुसरा दिवस होता. आजच्या दिवशी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन सरकरला चांगलंच धारेवर धरलं.

त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारची बाजू मांडताना सरकारविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव हा जनतेच्या प्रश्नांसाठी नव्हे तर संभ्रम निर्माण करण्यासाठी आणला असल्याचं म्हटलं आहे. (Amit Shah on No Confidence Motion to create confusion in Public Reply by Amit Shah)

शहा म्हणाले, आज विरोधकांचे सदस्य गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्ताव घेऊन सभागृहात उपस्थित होते. त्यावर मी माझे विचार मांडत आहे. मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार आहे त्यामुळं याच अनुच्छेद ७५ नुसार मंत्रिमंडळाविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला. आजवर स्वातंत्र्यानंतर २७ वेळा अविश्वास प्रस्ताव सादर झाले, तर ११ वेळा विश्वास प्रस्ताव या सदनात मांडले. (Marathi Tajya Batmya)

अनेकदा जनआंदोलनावेळी जनतेची भावना मांडण्यासाठी अशा प्रकारे अविश्वास प्रस्ताव आणला जातो. पण हा अविश्वास प्रस्ताव असा आहे की, ज्यामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाविरोधात ना जनतेला अविश्वास आहे की सभागृहाला अविश्वास आहे. तरी देखील विरोधक अविश्वास प्रस्ताव घेऊन आले आहेत. पण याचा उद्देश काय आहे? जनतेत भ्रम निर्माण करण्याचा याचा उद्देश आहे. (Latest Marathi News)

मी विरोधकांना एवढचं सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही अविश्वास प्रस्ताव घेऊन येता तेव्हा त्यावर जी चर्चा होते त्यावेळी त्यामध्ये सरकारविरोधात काही मुद्दे तर मांडायचे. मी सर्व भाषणं ध्यान देऊन ऐकली आहेत त्यानंतर मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की हा अविश्वास प्रस्ताव केवळ भ्रम निर्माण करण्यासाठी आणला आहे, हा जनतेच्या इच्छांचं प्रतिबिंब नाही. अल्पमताचा तर प्रश्नच येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT