No Confidence Motion: पंतप्रधान मोदी उद्या लोकसभेत बोलणार; पण...

No Confidence Motion: पंतप्रधान मोदी उद्या लोकसभेत बोलणार; पण...

उद्या पंतप्रधान मोदी लोकसभेत बोलणार; पण...

अविश्वास प्रस्तावावर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लोकसभेत बोलणार आहेत. याची माहिती यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहात दिली. पण मणिपूरमध्ये शांतता राखावी यासाठी संपूर्ण सभागृहानं त्यांना सहकार्य करावं असंही यावेळी राजनाथ यांनी म्हटलं.

मग मुख्यमंत्री कसा बदलणार?

काँग्रेसचं सरकार असतांना तिथं नागा कुकी संघर्ष झाला होता. 700 लोक तेंव्हा मारले होते. तेंव्हा उत्तर राज्यमंत्री यांनी दिल होतं आणि हे पंतप्रधान का बोलत नाहीत असं म्हणत आहेत. इथं मी उत्तर द्यायला तयार आहे, असं म्हणत असताना मला मात्र बोलू दिल नाही. मौन राखणारे तिथं बसले आहेत आम्ही उत्तर देणारे आहोत. ही परिस्थितीजन्य हिंसा आहे याच्यावर राजकारण होता कामा नये, अशा शब्दांत शहांनी यावेळी मोदींबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर दिलं. कुठल्याही राज्यांत कलम 356 तेंव्हा लावतात जेव्हा तिथलं काम ठप्प झालेलं असतं. पण तिथं मुख्यमंत्र्यांसह सर्व सहकार्य करत आहेत, मग मुख्यमंत्री कसा बदलणार?

म्यानमारमधील परिस्थितीमुळं मणिपूरचं वातावरण बिघडलं - शहा

मागच्या साडे सहा वर्षांपासून मणिपूरमध्ये भाजपचं सरकार आहे. पण 3 मे पूर्वी एकही दिवस इथं कर्फ्यू लावला नव्हता. 2021मध्ये म्यानमारचं सरकार पडलं आणि मिलिटरी सरकार आलं. मिझोराम आणि मणिपूरमध्ये म्यानमारमधून कुकी नागरिक आले. तिथं ओपन बॉर्डर आहे त्यामुळं थेट ते लोक येऊ लागले. आम्ही 2021मध्ये बॉर्डर बनवण्याचं काम सुरू केलं. जानेवारी महिन्यात आम्ही तिथं आलेल्या शरणार्थींची एन्ट्री सुरू केली. यामुळं कुकीची संख्या वाढेल असं मैतेई लोकांना वाटू लागलं. 3 मे पासून तिथली परिस्थिती बिघडलेली आहे ती अजूनही तशीच आहे.

मणिपूरच्या घटनांवर राजकारण करणं लाजीरवाणं - शहा

मणिपूरमध्ये जी घटना घडली त्याच्यावर मी सवित्तर बोलू इच्छितो. विरोधी पक्षाच्या मणिपूरमधील मुद्याशी मी सहमत आहे. घडलेली घटना लाजीरवाणी आहे पण यावर राजकारण करणं त्यापेक्षाही लाजीरवाणं आहे. हे सरकार मणिपूरवर बोलायला तयार नाही हा भ्रम पसरवला जात आहे. मी पत्र लिहून चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं होतं. पण विरोधकांनी सदनात चर्चा करू दिली नाही. गृहमंत्र्यांना मणिपूरबाबत बोलू दिलं जात नाही ही कसली लोकशाही?

हा अविश्वास प्रस्ताव पडणार अन् मोदी पुन्हा पंतप्रधान होतील - शहा

हा अविश्वास प्रस्ताव पडणार आहे आणि पुन्हा मोदी पंतप्रधान होतील. तुम्ही अविश्वास म्हणा पण लोकांच्या मनात मोदींबद्दल विश्वास आहे, अशा विश्वास यावेळी शहांनी व्यक्त केला. नॉर्थ ईस्टमध्ये हिंसा कमी झाल्याचाही दावा त्यांनी केला. यापूर्वी UPAचं सरकार होत तेंव्हा फक्त भांडण लावण्याचं काम केलं. मोदींनी नॉर्थ ईस्टला आपल्यासोबत जोडून ठेवण्याचं काम केलं. अंतर रस्ते, विमानानं कमी होत नाही तर हृदयानं कमी होतं. मोदी 9 वर्षात 50 पेक्षा जास्त वेळा नॉर्थ ईस्टला जाऊन आले, असंही शहांनी यावेळी सभागृहाला सांगितलं.

अमित शहांनी मणिपूरबाबत सभागृहात भाष्य केलं; विरोधक भडकले!

अमित शहा यांनी गेल्या नऊ वर्षात सरकारनं केलेल्या कामांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ईशान्य भारतासाठी मोदी सरकारनं काय काय केलं याचा पाढा वाचला. आजवर इथं युपीए सरकारनं काहीही केलं नाही ते मोदी सरकारनं केल्याचं त्यांनी सांगितलं. शेवटच्या टप्प्यात त्यांनी मणिपूरच्या स्थितीवर भाष्य केलं. मणिपूरच्या हिंसेचं आम्ही समर्थन करत नाही, असं सांगताना त्यांनी त्याचं खापर काँग्रेसवर फोडलं, यानंतर लगेचच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे भडकले आणि शहांनी उत्तर देण्याऐवजी राजकारण करु नये असं त्यांना सुनावलं.

सभागृहात असा नेता आहे ज्याचं 13 वेळा लाँचिंग झालं - शहा 

कोरोना काळात वॅक्सिनला विरोधकांनी विरोध केला. अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी सांगितलं हे मोदी वॉक्सिन आहे घेऊ नका. पण मोदींनी वॉक्सिन देऊन लोकांचे प्राण वाचवले. या काळात 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य आम्ही त्यांच्या घरी पाठवून त्यांचं घर चालू ठेवलं.

उज्वला योजना, लाईट, 3 कोटी लोकांना घर, बँक खाती उघडली, 80 टक्के लोकांना धान्य आमच्या सरकारनं दिलं. या सभागृहात एक असा एक नेता आहे ज्याचं 13 वेळा लोंचिंग केलं होत. 'त्या' कलावतीला घर, लाईट, धान्य देण्याचं काम मोदींनी केलं. एक वेळा दलित आणि एक वेळा आदिवासी यांना राष्ट्रपतीपदासाठी संधी दिली. गरीब लोक मोदींमध्ये आपला मित्र शोधतात असंही यावेळी शहा म्हणाले.

एकही सुट्टी न घेता मोदी काम करताहेत - शहा

२००८मध्ये अविश्वास प्रस्ताव आणला होता. तेव्हा पैशानं लोकप्रतिनिधींना विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला. सर्व नियम धाब्यावर बसवून सत्ता राखणे हेच काँग्रेसचं उद्दीष्ट आहे. आम्ही पण यूपीएसारखं पैशाचा वापर करून सत्ता वाचवू शकत होतो. पण अटलजी यांचं सरकार १ मतांनी पडलं आणि आमचं सरकार गेलं. भ्रष्टाचार करण्याचं चरित्र काँग्रेसचं आहे. एक मतानं आमची सत्ता गेली पण नंतर पूर्ण बहुमतानं सरकार आलं.

कोट्यावधी पैसे खर्च करून बहुमत विकत घेणारे लोक आज आमच्या समोर बसले आहेत. गरीबी हटओच्या नावावर वचनं दिली आणि सत्ता आणली पण गरीबी तशीच राहिली. पण पंतप्रधान मोदी यांना गरीबीच्या झळा बसल्या आहेत.

जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव - शहा  

विरोधी पक्षांनी केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर कालपासून चर्चेला सुरुवात झाली आहे. आज या चर्चेचा दुसरा दिवस होता. आजच्या दिवशी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन सरकरला चांगलंच धारेवर धरलं. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारची बाजू मांडताना सरकारविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव हा जनतेच्या प्रश्नांसाठी नव्हे तर संभ्रम निर्माण करण्यासाठी आणला असल्याचं म्हटलं आहे.

या देशाचा आम्हाला अभिमान, पण...; अब्दुल्लांचा सरकारवर निशाणा

आम्ही या देशात राहतोय याचा आम्हाला अभिमान आहे. पण या देशानं केवळ हिंदूंचीच नव्हे तर इथं राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी घ्यायला हवी. पंतप्रधान केवळ एकाच रंगाचं प्रतिनिधित्व करु शकत नाहीत ते भारताचं प्रतिनिधित्व करतात. गेल्या दहा वर्षात तुम्ही किती काश्मिरींना पुन्हा परत आणलं आहे? त्यामुळं आम्ही भारताचा भाग नाही असं म्हणू नका, आम्हाला पाकिस्तानी, गद्दार म्हणू नका. आम्ही या देशाचा भाग आहोत, अशा शब्दांत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला यांनी सरकारवर टीका केली.

त्यांच्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले, केंद्र सरकारनं काश्मिरी हिंदू पंडितांसाठी काहीही केलेलं नाही हे चुकीचं आणि दिशाभूल करणार आहे.

अमित शहा आज संध्याकाळी ५ वाजता अविश्वास प्रस्तावावर बोलणार

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत मणिपूर मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी ५ वाजता लोकसभेत अविश्वास प्रस्ताव(No Confidence Motion) वर बोलणार आहेत. राहुल गांधींच्या आरोपांवर केंद्रीय गृहमंत्री काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राहुल गांधींनी 'फ्लाईंग किस' दिला? स्मृती इराणींचा गंभीर आरोप

विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू आहे. यादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी फ्लाईंक किस दिल्याचा आरोप भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी भाषण संपल्यानंतर सभागृहातून बाहेर जात असताना त्यांनी विरोधकांकडे पाहूण इशारा केला यावरून सभागृहात गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे.

मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार चर्चेसाठी तयार

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार चर्चेसाठी तयार आहे, असे वारंवार सांगितले. मात्र विरोधकांनी त्यापासून पळ काढला, आम्ही नाही, असे स्मृती इराणी यांनी स्पष्ट केले.

मणिपूर भारताचा अविभाज्य भाग - स्मृती इराणी

केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार स्मृती इराणी राहुल गांधींना उत्तर देताना म्हणाल्या, "मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. खंडित ना था, ना है और ना कभी होगा"

मणिपूरच्या मुद्द्यावर स्मृती इराणी आक्रमक  

गिरीजा टिककुच्या जीवनावर फिल्म आली होती, तर त्यावर काँग्रेसच्या नेत्याने प्रापौगंडा म्हणलं. देशाला विभाजनाचा भाग म्हणता मला सांगा गिरीजा टिक्कुला कधी न्याय मिळणार? कश्मीरचा आवाज देशाचा आवाज नाही का?

राजस्थानच्या भिलवाडात 14 वर्षच्या मुलीवर बलात्कार करून तिला कापून टाकलं. त्या मुलीला जाळून टाकलंय गेलं. पश्चिम बंगालच्या घटनेबाबत ६० वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला तेव्हा हे कधीही बोलले नाहीत आणि मणिपूर मुद्द्यांवर प्रश्न विचारत आहेत. 2012 ला तत्कालीन कांग्रेसचे मुख्यमंत्री तरुण गोगाई यांनी संगीतलं होत की दंगे होत आहेत पण केंद्र सुरक्षा देत नाही, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

पीएम मोदींनी कलम ३७० हटवल्याने ते शक्य झालं - स्मृती इराणी

यांनी (राहुल गांधी) सांगितलं की ते कश्मीर ते कन्याकुमारी १३० दिवस चालत होते. मी पाय दुखीवर बोलणार नाही. काश्मीरमध्ये भारताने रक्तपात पाहिला आहे. हे कश्मीरमध्ये आपल्याच नातेवाईकांसोबत बर्फात खेळत होते. हे तेव्हाच शक्य झालं जेव्हा पीएम मोदींनी कलम ३७० हटवलं.

मणिपूर विभाजीत नाही तर तो भारताचा...; स्मृती इराणींचं राहुल गांधींना प्रत्युत्तर  

सभागृगहात ज्या प्रकारे आक्रमक वागणूक पाहायला मिळाली मी त्यांचा निषेध करते. सभागृहात पहिल्यांदा देशाच्या इतिहासात भारत मातेच्या हत्याचा उल्लेख करण्यात आला आणि काँग्रेस पक्ष टाळ्या वाजवत राहिला. यातून सर्व देशाला कोणाच्या मनात गद्दारी आहे याचे संकेत मिळाले. मणिपूर विभाजीत नाहीये तो भारताचा अविभाज्य घटक आहे. - स्मृती इराणी

मणिपूरमध्ये माझ्या मातेची हत्या झाली - राहुल गांधी

मी भाषणाच्या सुरूवातीला म्हणालो, भारत एक आवाज आहे, त्या आवाजाची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. याचा अर्थ भारत मातेची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. मणिपूरच्या लोकांना मारून तुम्ही भारताची हत्या केली आहे. तुम्ही देषद्रोही आहात, तुम्ही देशभक्त नाहीत. म्हणूनच पंतप्रधान मणिपूरमध्ये गेले नाहीत.

तुम्ही भारत मातेचे रक्षक नाहीत तर भारत मातेचे हत्यारे आहात. मी मातेच्या हत्येवर बोलत आहेत. मी आदरपूर्वक बोलतो आहे. तुम्ही मणिपूरमध्ये तुम्ही माझे मातेची हत्या केली आहे, माझी एक आई इथे उपस्थित आहे, दुसऱ्या मातेची मणिपूर येथे हत्या करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता येऊ शकते. भारतीय सेना एका दिवसात शांतता आणू शकते पण तुम्ही भारतीय लष्कराचा वापर करत नाहीयेत. कारण तुम्ही भारताला मणिपूरमध्ये मारू इच्छीत आहात.

यांच्या राजकारणाने मणिपूरमध्ये हिंदुस्तानाची हत्या केली - राहुल गांधी

एका महिलेला तुमच्यासोबत काय झालं असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच माझ्या समोर ती महिलेला ती थरथरायला लागली. तिच्या समोर ते दृश्य उभं राहिलं आणि ती महिला बेशुद्ध पडली, यांनी मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणाने मणिपूरला नव्हे हिंदुस्तानती मणिपूरमध्ये हत्या केली आहे. - राहुल गांधी

मणिपूर मुद्द्यावर राहुल गांधींचा PM मोदींवर जोरदार हल्ला, म्हणाले...

काही दिवसांपूर्वी मी मणिरपूरला गेलो, आपले पंतप्रधान मोदी अजून गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हिंदूस्तान नाहीये. मी मणिपूरचा उल्लेख केला, पण मणिपूरचे तुम्ही दोन तुकडे केले आहेत. मणिपूरमध्ये रीलिफ कँम्पमध्ये महिलांची भेट घेतली. त्या महिलेने सांगितले माझं एकच मुलं होतं. माझ्या डोळ्यासमोर त्याला गोळी मारली. मी पूर्ण रात्र मी त्या मृतदेहासोबत घालवली. मी फक्त कपडे सोबत घेऊन घर सोडलं. त्या महिलेनं एक फोटो काढून दाखवला आणि फक्त एवढंच माझ्यासोबत आहे असं त्या महिलेनं सांगितलं असे राहुल गांधी म्हणाले.

 थोड्याच दिवसांत माझा अहंकार कमी झाला; भारत जोडो यात्रेबद्दल राहुल गांधीचं वक्तव्य

मागच्या वर्षी 130 दिवसांसाठी मी भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेलो. माझ्यासोबत बरेच लोक होते. मी समुद्राच्या तटापासून बर्फाच्या प्रदेशपर्यंत गेलो. यात्रा अजून संपली नाहीये, ती सुरूच आहे. बऱ्याच जणांनी विचारलं मी मोठी यात्रा केली.म लाही सुरुवातीला माहीत नव्हतं मी यात्रा का सुरू केली.

जेव्हा मला भारताला पाहायचे होते. लोकांमध्ये जायचे होते. त्यांना समजून घ्यायचे होते. काही गोष्टी मला समजल्या. ज्या गोष्टीचं मला प्रेम होतं, ज्या गोष्टीसाठी मी मरायलाही तयार होतो, ज्या गोष्टींसाठी दहा वर्षे शिव्याही खाल्ल्या. ती गोष्ट मला समजून घ्यायची होती.

ज्या गोष्टीनं मझ्या हृदयामध्ये वेगळं नातं निर्माण केलं होतं अशा गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. मी गेल्या काही वर्षांपासून दहा ते बारा किलोमीटर चालतो आहे. मी हे सगळं का केलं याचा विचार करतो आहे. माझ्या मनात अहंकार होता. मात्र भारत अहंकाराला संपवण्याचे काम करतो. दोन ते तीन दिवसांनी माझ्या गुडघ्यांमध्ये त्रास होण्यास सुरुवात झाली. माझे जूने दुखणे पुन्हा वाढले.

थोड्याच दिवसांत माझा अहंकार होता तो कमी झाला. मी भारताला ज्या अहंकाराच्या भावनेनं पाहायला निघालो होतो तो अचानक कमी झाला, असे राहुल गांधी यांनी सांगितलं.

माझ्या मागच्या वेळच्या भाषणामुळे तुम्हाला त्रास झाला, पण आज तुम्ही घाबरायची गरज नाही

आजच्या भाषणाची सुरूवात करताना राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. यासोबतच राहुल गांधी यांनी माझ्या मागच्या वेळच्या भाषणामुळे तुम्हाला त्रास झाला पण आज तुम्ही घाबरायची गरज नाही, अशा शब्दात भाषणाला सुरूवात केली. माझं भाषण आदाणी यांच्याबद्दल नसणार आहे, त्यामुळे तुम्ही शांत राहु शकता, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

रुमी म्हणाला होता की, जो शब्द दिल से आते है वो शब्द दिल में जाते है.... आज मैं दिमाग से नही दिल से बोलना चाहता हूं.... आणि मी आज जास्त आक्रमणही काही करणार नाही.आज मी एक दोन गोळे मारणार पण जास्त आक्रमण करणार नाही, त्यामुळं तुम्ही निवांत राहू शकता अशी मिश्किल टिप्पणीही राहुल गांधी यांनी यावेळी केली.

राहुल गांधीचे लोकसभेत भाषण सुरू

मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या लोकसभेतील चर्चेचा आज दुसरा दिवस आहे. काल काही खासदारांकडून राहुल गांधी यांनी बोलावं अशी मागणी केली होती . पहिल्या दिवशी चर्चेची सुरवात राहुल गांधी करतील अशा चर्चेदरम्यान गौरव गोगोई बोलण्यासाठी उभे राहिले. यानंतर आज दुसऱ्या दिवशी अखेर राहुल गांधी भाषणासाठी उभे राहिले आहेत.

काँग्रेस खासदार राहुल गांधी संसदेत पोहोचले 

विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा आज दुसरा दिवस आहे. या चर्चेदरम्यान आज काँग्रेस खासदार राहुल गांधी संसदेत पोहोचले असून ते आज संसदेत बोलण्याची शक्यता आहे.

सभागृहाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब

लोकसभेचं काम सुरू झाल्यानंतर तु्म्ही प्रश्नोउत्तरांचा तास सुरू झाल्यानंतर चालू दिला असता तर बरं होतं. माझा प्रयत्न असतो की या वेळेत सर्वजण बोलावं. प्रश्नकाळात तुम्हाला चर्चा करायची नसते. सरकार उत्तरे देण्यासाठी तयार आहे. प्रश्न विचारण्यासाठी वेळ दिला आहे, ही पद्धत योग्य नाही असे अवाहन लोकसभा अध्यक्षांनी करून देखील विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने सभागृहाचं कामगाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं .

राहुल गांधी आज सभागृहात बोलणार?  अविश्वास ठरावावर लोकसभेत आज पुन्हा चर्चा

लोकसभेत अविश्वास ठरावावर जोरदार चर्चा सुरू आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी बोलावे यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. एकीकडे विरोधक मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याची मागणी करत आहेत, अविश्वास ठरावावर आजही लोकसभेत गदारोळ पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा, स्मृती इराणी आणि निर्मला सीतारामन भाजपकडून विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आज सभागृहात बोलू शकतात.

राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब 

आजचे राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

No Confidence Motion Live Updates : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार आणि विरोधक या दोघांनीही तयारी सुरू केली आहे. दोन्ही गटांकडून रणनीती आखली जात आहे. यादरम्यान संसदेत मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर काल लोकसभेत चर्चा सुरू झाली. आजही ती सुरू राहणार आहे. या चर्चेच्या सर्व अपडेट्स  वाचा एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com