Amrullah Saleh sakal
देश

अमरुल्लाह सालेह यांचा ठावठिकाणा लागेना?

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर माजी उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही

सकाळ वृत्तसेवा

काबूल (वृत्तसंस्था): अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर माजी उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. पंजशीर खोऱ्यात तालिबानने अमरुल्लाह सालेह यांच्या घरावर ताबा मिळवला आणि त्यांच्या भावाचीही हत्या केली. तरीही त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे सांगितले जात आहे.

नॅशनल रेजिस्टेंन्स फोर्सच्या सूत्रानुसार, अमरुल्लाह सालेह हे आपल्या समर्थकांसह ताजिकस्तानमध्ये पोचले आहेत. पंजशीर खोऱ्याला जेव्हा तालिबानने वेढा घातला तेव्हा ताजिकिस्तान सरकारने सालेह यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. परंतु काहींनी सालेह ताजिकिस्तानमध्ये नसल्याचे म्हटले आहे.तालिबानच्या विरोधात पुन्हा नव्याने आघाडी करण्यासाठी सालेह यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे सांगितले जात आहे.

तालिबानच्या विरोधात उभे राहिलेले सालेह यांच्या घरी तालिबानचा कब्जा झाला तरी त्यांचा शोध घेऊ शकले नाही. सालेह सुरक्षित असून त्यांनी अन्य ठिकाणी आश्रय घेतला असल्याचे वृत्तही आले आहे. काही काळापूर्वी त्यांच्या घरातून सोने आणि डॉलर मिळण्याचा दावा केला होता. परंतु तालिबानने या वृत्ताचे खंडन केले होते. तालिबानने पंजशीरच्या लढाईत अमरुल्लाह सालेह यांच्या भावाला रोहुल्ला अझिझी यांची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह दफन करण्यासही विरोध केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT