esakal | भारतातील मुस्लिमांच्या जन्मदरात घट; अमेरिकेन संस्थेच्या सर्व्हेचा निष्कर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

भारतातील मुस्लिमांच्या जन्मदरात घट; अमेरिकेन संस्थेच्या सर्व्हेचा निष्कर्ष

भारतातील मुस्लिमांच्या जन्मदरात घट; अमेरिकेन संस्थेच्या सर्व्हेचा निष्कर्ष

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारतात हिंदू व मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीच्या दरात १९५१ पासून आतापर्यंत फार फरक दिसलेला नाही. मात्र काही दशकांपासून देशातील सर्व प्रमुख धर्मांच्या नागरिकांच्या जन्मदरात घट होत असलेली आढळले आहे. विशेष करून मुस्लिमांचा जन्मदर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ या विना - नफा संस्थेने याबाबत संशोधन केले आहे. भारतात हिंदू व मुस्लिम या धर्मांशिवाय ख्रिस्ती, बौद्ध, आणि जैन समुदायातील जन्मदरही घटला आहे, असे संशोधनपर अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा: दोन तृतीयांश 18+ लोकसंख्येला पहिला डोस; तर 'या' राज्यांमध्ये संपूर्ण लसीकरण

एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भारतात १९९२ ते २०१५ या कालावधीत मुस्लिमांच्या लोकसंख्येत वेगाने घट झाली आहे. १९९२मध्ये मुस्लिमांचा जन्मदर ४.४ टक्के होता. २०१५मध्ये तो २.६ पर्यंत खाली आला. दुसरीकडे हिंदूचा जन्मदरही ३.३ टक्क्यांहून २.१वर स्थिरावली आहे. तसेच हिंदू व मुस्लिमांच्या जन्मदरातील फरकही कमी झाला असून तो ०.५ टक्के एवढा नोंदविला आहे. हा फरक पूर्वी १.१ टक्का एवढा होता. एकूणच मुस्लीम समाजातील लोकसंख्यावाढ अन्य धर्मांपेक्षा जास्त असली तरी त्यात आता मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

हेही वाचा: उरी सेक्टरजवळ 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; मोठा शस्त्रसाठा हस्तगत

जन्मदरातील अंतर कमी

देशात २०१९-२०००मध्ये झालेल्या पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्व्हेनुसार भारतातील विविध धर्मांतील जन्मदरातील अंतर कमी होत आहे. भारतातील सरासरी जन्म दर सध्या २.२ टक्के आहे, जो १९५१ च्या तुलनेत खूप कमी झाला आहे. पण जगाच्या तुलनेत तो अद्यापही जास्त आहे. आसाममध्ये मुस्लिमांची लोकसंख्या वाढीचा दर वेगाने घटला आहे. तेथे हा जन्मदर २.४ टक्के असून हिंदूंचा जन्मदर १.६ तर ख्रिस्ती धर्मीयांचा १.५ टक्के आहे.

हेही वाचा: प्रत्येकाला मिळणार युनिक हेल्थ आयडी; मोदींकडून योजनेचा होणार शुभारंभ

जन्मदराबाबतच्या गोष्टी आधारहीन

भारतात मुस्लिम समाजात जन्मदर जास्त असल्याचे मानले जाते. तो तसाच राहिला तर भारतातील एकूण लोकसंख्येत मुस्लिमांची संख्या जास्त असेल, असेही म्हटले जाते. पण या सर्व गोष्टी तथ्यहीन आहेत. त्याला कोणताही आधार दिसत नाही, असा दावा ‘प्यू रिसर्च सेंटर’ने केला आहे. अन्य धर्मांप्रमाणेच मुस्लिमांचा जन्मदरही कमी झाला आहे, असे या संस्थेने म्हटले आहे.

जन्मदर (टक्क्यांत)

धर्म : १९९२ : २०१५

मुस्लिम : ४.४ : २.६

हिंदू : ३.३ : २.१

loading image
go to top