एका तरुणीवर पाच जणांनी लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केल्याचा (sexually assaulted) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video goes viral) होत आहे.
आसाम- एका तरुणीवर पाच जणांनी लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केल्याचा (sexually assaulted) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video goes viral) होत आहे. व्हिडिओ अंगावर काटा आणणारा असून तरुणीवर पाच आरोपी अत्याचार करताना दिसताहेत. आसाम पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी फोटो जारी केले असून आरोपींची माहिती देण्याचे आवाहन केलं आहे. असे असले तरी ही धक्कादायक घटना केव्हा आणि कुठे घडली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. (Assam Girl thrashed sexually assaulted by five men as video goes viral)
आसाम पोलिसांनी व्हिडिओचे स्क्रिनशॉट जाहीर केले आहेत. आरोपींबाबत माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे. आसाम पोलिसांनी ट्विट करुन म्हटलंय की, हे पाच नराधमांचे फोटो असून ते एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करत आहेत. घटनेची वेळी आणि ठिकाण नक्की माहिती नाही. कोणालाही या गुन्हाची किंवा गुन्हेगारांची माहिती असेल तर त्यांनी संपर्क करावा. त्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल.
आसाम पोलिसांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलंय की, अशा किळसवाण्या गुन्हातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी आपण एकत्र असायला हवं. नेमकं कुठल्या ठिकाणी ही घटना घडली नक्की माहिती नाहीये. शिवाय आसाममध्ये ही घटना न घडल्याचीही शक्यता आहे. आम्ही गुन्हेगारांचा शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहोत.
दरम्यान, केंद्रीय मंत्री किरन रिजिजू यांनी ट्विट करुन म्हटलंय की, 'ही घटना जोधपूर सुसाईड प्रकरणाची संबंधित नाही. जोधपूर पोलिसांशी माझी चर्चा झाली आहे. पण, या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हायला हवी.' दिल्ली पोलिस कमीशनर रॉबिन हिबू यांनीही याची पुष्टी केली असून नागालँडमधील लोविकाली सुमी या महिलेच्या आत्महत्येशी याचा संबंध नसल्याचं म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.