Lady Singham Esakal
देश

Lady Singham: ‘डॅशिंग लेडी सिंघम’चं अपघाती निधन; होणाऱ्या नवऱ्याला केली होती अटक

लेडी सिंघम आणि दबंग कॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक जुनोमनी राभा यांचं अपघाती निधन झालं

अंकिता खाणे (Ankita Khane)

लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आपल्या होणाऱ्या नवऱ्याला अटक करणाऱ्या आणि वादग्रस्त कारकिर्द ठरलेल्या जुनोमनी राभाचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्या आसाम पोलीस दलात उप निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. नागाव जिल्ह्यातील कलियाबोर येथील सरूभुगिया गावात या लेडी सिंघमची कार एका कंटेनरला धडकली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.

जुनोमनी या आपल्या खासगी कारमधून प्रवास करत होत्या. त्यांनी वर्दी परिधान केलेली नव्हती. त्यांच्या कारची कंटेनर ट्रकला धडक बसली. या अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुनोमनी राभांना लेडी सिंघम आणि दबंग कॉप म्हणूनही ओळखलं जात होतं. त्या मोरीकोलोंग पोलीस ठाण्याच्या प्रभारी होत्या. गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी म्हणून त्या खूप प्रसिद्ध होत्या. काल (सोमवारी) मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच गस्त पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या जुनोमनी यांना ताततडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, याबाबतची माहिती जाखलाबांधा पोलीस ठाण्याच्या प्रभारी पवन कालिता यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशामधून येत असलेला कंटनेर ट्रक पोलिसांनी जप्त केलं आहे. तर अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. नागांव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधीक्षक लीना डोले यांनी सकाळी घटनास्थळी जाऊन संपूर्ण माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांना संपाचा फटका! पाण्याचे संकट कायम, जिल्हा प्रशासनासोबतची बैठक निष्फळ

Ajinkyatara Fort: शिवकालीन वैभवाने उजळणार ‘अजिंक्यतारा’; ११० कोटींच्या विकास आराखड्याने बदलणार रूप, सातारच्या गौरवशाली इतिहासाला नवी झळाळी

Vidarbha: समृद्धीवर ट्रॅव्हल्स ट्रकवर मागून धडकली; मेहकरजवळील घटना; १५ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी

Karad Highway: कऱ्हाडमध्ये पहिल्याच पावसात महामार्गाची पोलखोल; गटार तुंबले, पाणी-चिखल रस्त्यावर, गटारावरील तुटलेली झाकणेही जीवघेणी

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना धक्का! सलग 10 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅमचा नवा दर किती?

SCROLL FOR NEXT