Doctors Sakal
देश

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ला दखलपात्र गुन्हा

डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले आणि ते रोखण्यासाठी खासदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : डॉक्टर (doctor) आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर (health worker) हल्ला वा हिंसक प्रकार झाला, तर हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. हे प्रकार करणाऱ्यास तीन महिने ते दोन वर्षांचा कारावास आणि दोन लाख रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज लेखी उत्तरामध्ये दिली आहे. ( assault health worker Cognizable offense)

डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले आणि ते रोखण्यासाठी केलेल्या उपायाबाबत खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, डॉ. अमोल कोल्हे, सुभाष भामरे, शशी थरूर हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लेखी उत्तर दिले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे, की केंद्र सरकार हे या प्रश्‍नी राज्यांकडून वारंवार आढावा घेत असते. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी साथरोग आजार नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे.

कायद्यातील सुधारणेमुळे डॉक्टर वा आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल. हल्ला करणाऱ्यांना तीन महिने ते पाच वर्षे कारावास, दोन लाखांपर्यंत दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत केल्यास सहा महिने ते सात वर्षे कारावास आणि एक ते पाच लाखांचा दंड आकारला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'MS Dhoni ला कोणीही मिस करत नाही, CSK ने लोकांना मूर्ख बनवणे थांबवावे'; वर्ल्ड कप विजेत्या भारतीय खेळाडूकडून IPL फ्रँचायझीची पोलखोल

Outsourced Hiring: आउटसोर्स भरती म्हणजे युवकांचे शोषण; हायकोर्टाचा मोठा निर्णय, सरकारी भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

T20I Record: क्रोएशियाच्या २३ वर्षीय फलंदाजाचा अविश्वसनीय वर्ल्ड रेकॉर्ड; IPL सोडा पठ्ठ्याने ३ सामन्यांत जगाचे लक्ष वेधले

‘बाप्या’मधील राजश्री देशपांडेच्या लूकची चर्चा शैलजापासून शैलेशपर्यंतचा प्रवास ठरतोय खास!

Mumbai: महागाई वाढता वाढे! दरवाढीच्या तव्यावर भाजी-पोळी केंद्रे होरपळली, ग्राहकसंख्येत घट; व्यावसायिक चिंतेत

SCROLL FOR NEXT