asaduddin owaisi esakal
देश

Ayodhya Ram Mandir : ''तरुणांनो, आपली मशीद आपण गमावली...'' राम मंदिरावरुन ओवैसी काय म्हणाले?

अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभं राहात आहे. येत्या २२ जानेवारी रोजी रामलल्ला गर्भागृहात विराजमान होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

हैदराबादः अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभं राहात आहे. येत्या २२ जानेवारी रोजी रामलल्ला गर्भागृहात विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहेत. जसजसं अयोध्येतील सोहळा जवळ येत आहे तसं राजकीय विधानं जोर धरु लागली आहेत.

एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी एक मोठं विधान केलं आहे. त्यांचं स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या व्हिडीओमध्ये ते तरुणांना पाठिंबा आणि ताकद कायम ठेवण्याचं आवाहन करताना दिसून येत आहेत.

व्हिडीओमध्ये ओवैसी म्हणतात, तरुणांनो आपण आपली मशीद गमावली आहे. तिथे काय केलं जात आहे, ते आपण बघत आहोत. तुम्हाला याचा त्रास होत नाही? जिथे आपण ५०० वर्षे बसून कुराण-ए-करीमचं पठण केलं, आज ती जागा आमच्या हातामध्ये नाही.

ते पुढे म्हणतात, तरुणांनो, आणखी तीन ते चार मशिदींबाबत षड्यंत्र सुरु आहे. ज्यामध्ये दिल्लीतल्या मशिदीचाही समावेश आहे. या शक्ती तुमच्या मनातून ऐक्य काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी परिस्थिती तुम्हाला पाहिजे आहे का? या गोष्टीकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे.

असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणतात, तुमची ताकद आणि तुमची एकता कायम ठेवा. मशिदी लोकवस्तीत ठेवा. कारण या मशिदी आपल्याकडून काढून घेतल्या जातील. आजचे तरुण उद्या म्हातारे होणार आहेत. त्यामुळे आपण स्वतःला, कुटुंबाला आणि शहराला कशी मदत करु शकतो, याचा विचार केला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT