IPL 2024 | आयपीएलपूर्वी केएल राहुलच्या संघाला मोठा धक्का, 'या' दिग्गजाने सोडली संघाची साथ

IPL 2024 Lucknow Super Giants
IPL 2024 Lucknow Super Giants

IPL 2024 Lucknow Super Giants : इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामापूर्वी लखनऊ सुपर जायंट्ससाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अलीकडेच मार्गदर्शक गौतम गंभीरने एलएसजी सोडल्यानंतर आता आणखी एका कोचिंग स्टाफने संघ सोडला आहे.

एलएसजीचे फलंदाजी प्रशिक्षक विजय दहिया आता संघाचा भाग नसल्याची माहिती फ्रँचायझीनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आयपीएलचा 17वा हंगाम मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

IPL 2024 Lucknow Super Giants
Shubman Gill : 'पुढच्या सामन्यात धावा केल्या नाहीत तर...', दिग्गज खेळाडूने गिलला दिला इशारा

19 डिसेंबर रोजी दुबई येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीग मिनी लिलावाच्या काही दिवस आधी गंभीरने LSG ची साथ सोडली. यानंतर माजी भारतीय खेळाडू त्याच्या जुन्या फ्रेंचायझी कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाला. गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरला दोनदा चॅम्पियन बनवले आहे आणि संघ मालकांना पुन्हा एकदा त्याच्याकडून अपेक्षा असतील.

IPL 2024 Lucknow Super Giants
Who Is Muhammad Waseem : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितपेक्षा भारी 'सिक्सर किंग', अवघ्या 1 वर्षात ठोकले शंभर षटकार अन्...

पण, एलएसजीच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रथम गंभीर आणि आता दहिया यांच्या जाण्याने फ्रँचायझीला नवीन कोचिंग स्टाफची निवड करावी लागेल. एवढ्या कमी वेळात नवा कोचिंग स्टाफ संघातील खेळाडूंशी जुळवून घेऊ शकेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com