Ayodhya Ram Mandir  esakal
देश

Ayodhya Ram Mandir : राज्यात आज कोणतीही सरकारी सुटी जाहीर केली जाणार नाही; मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुटी जाहीर करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सिद्धरामय्या यांच्या नावात राम आहे, माझ्या नावात शिव आहे. राजकारणात धर्माची गरज आहे, धर्मात राजकारणाची नाही, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले.

बंगळूर : अयोध्येतील राममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या (Ayodhya Ram Mandir) पार्श्‍वभूमीवर आज (ता. २२) कर्नाटकात कोणतीही सरकारी सुटी जाहीर केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी स्पष्ट केले आहे. राममंदिराच्या उद्‌घाटनानिमित्त सोमवारी शासकीय सुटी जाहीर करावी, अशी मागणी हिंदू संघटना आणि भाजपसह विविध संघटनांनी (Hindu Association) केली.

मात्र, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुटी जाहीर करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तुमकूरमध्ये प्रसारमाध्यमांशी ते म्हणाले की, आज धर्मादाय खात्याच्या मंदिरात विशेष पूजा होणार आहे; पण सरकारी सुटी असणार नाही. मीही आज महादेवपूर येथील राम मंदिराचे उद्‌घाटन करत आहे. मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

धर्मात राजकारण नको - शिवकुमार

सिद्धरामय्या यांच्या नावात राम आहे, माझ्या नावात शिव आहे. राजकारणात धर्माची गरज आहे, धर्मात राजकारणाची नाही, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले. ‘आम्ही भक्ती, आदर आणि धर्माच्या संवर्धनासाठी करत नाही. मंदिरात कोणते विधी करावेत. हे आम्हाला कोणी सांगण्याची गरज नाही. आमचा विश्वास आहे की प्रार्थनेचे फळ मिळेल. आम्हाला कोणी सांगण्याची किंवा दबाव आणण्याची गरज नाही, असे सांगत त्यांनी सरकारी सुटी देण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT