शिवाजी विद्यापीठात 57 वर्षांपूर्वीच वाल्मिकी ऋषींच्या 'रामायणा'वर झाले संशोधन; कथेची वेगळ्या भूमिकेतून केली पाहणी

वाल्मिकी ऋषींनी (Valmiki Rishi) रचलेले ‘रामायण’ हे महाकाव्य आणि हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ आहे.
Ramayana Shivaji University
Ramayana Shivaji Universityesakal
Summary

कोल्हापुरातील संत साहित्याचे अभ्यासक वसंत जोशी यांनी सोलापूरमधील डॉ. वि. म. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री एकनाथकृत भावार्थ रामायणाचा विवेचक अभ्यास’ या विषयावर संशोधन केले.

-संतोष मिठारी

कोल्हापूर : वाल्मिकी ऋषींनी (Valmiki Rishi) रचलेले ‘रामायण’ हे महाकाव्य आणि हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ आहे. या ‘रामायणा’ (Ramayana) वर ५७ वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठात (Shivaji University) संशोधन झाले आहे. त्यात तुलनात्मक, भावार्थ, अध्यात्मक पैलूंनी सांगलीचे प्रा. टी. पी. उपाध्ये, कोल्हापुरातील वसंत स. जोशी आणि पुणे येथील अंजली माधव पर्वते यांनी अभ्यास करून पीएच.डी. पदवी (Ph.D. Degree) मिळविली आहे.

मराठी अधिविभागातून सांगलीतील प्रा. त. पा. तथा टी. पी. उपाध्ये यांनी सन १९६७ मध्ये ‘मराठीतील रामायणे आणि प्राकृतातील रामायणे’ यांचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यांचे मार्गदर्शक कोल्हापुरातील (Kolhapur) डॉ. दु. का. संत होते. त्यांनी इ. स. १८०० अखेरपर्यंतच्या मराठीतील आणि प्राकृत्तातील रामायणांची कथादृष्ट्या तुलना केली आहे. त्यांनी रामायण कथेची वेगळ्या भूमिकेतून पाहणी केली आहे.

Ramayana Shivaji University
राज्यसेवा परीक्षेत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पोरानं राज्यात पटकावला प्रथम क्रमांक; उपजिल्हाधिकारी पदाचं स्वप्न झालं पूर्ण

कोल्हापुरातील संत साहित्याचे अभ्यासक वसंत जोशी यांनी सोलापूरमधील डॉ. वि. म. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री एकनाथकृत भावार्थ रामायणाचा विवेचक अभ्यास’ या विषयावर संशोधन केले. त्यांनी याबाबतचा अभ्यासाचा प्रबंध सन १९६८ मध्ये शिवाजी विद्यापीठाला सादर केला. ‘भावार्थ रामायण’ हा एकनाथांच्या प्रतिमेच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारा व मराठी साहित्यात प्रदीर्घ काव्यलेखनाची परंपरा सुरू करणारा ग्रंथ आहे. एकनाथांनी नवविचार देणाऱ्या रामचरित्राची केलेली कालोचित मांडणी, मूळ वाल्मिकी रामायणाची संस्कृत व प्राकृत भाषातील स्थित्यंतरे आणि मराठीतील रामकथालेखनाचा परामर्श जोशी यांनी प्रबंधातून मांडला.

कलाशाखेत संस्कृत विषयामध्ये पीएच.डी. पदवीसाठी अंजली पर्वते यांनी ‘अध्यात्म रामायणः एक चिकित्सक अभ्यास’ याविषयावर संशोधन करून सन १९९५ मध्ये विद्यापीठाला प्रबंध सादर केला. त्यांना मार्गदर्शक म्हणून सांगलीमधील विलिंग्डन महाविद्यालयातील निवृत्त संस्कृत विभागप्रमुख डॉ. के. वा. आपटे लाभले. पर्वते यांनी तौलनिक अभ्यास केला. त्यांना अध्यात्म रामायण हे शांकर अद्वैताचा पुरस्कार करणारे असल्याचे संशोधनातून सर्वासमोर मांडले.

Ramayana Shivaji University
अशीही रामभक्ती! पाण्यावर तरंगत्या रांगोळीतून साकारला 'रामसेतू'चा देखावा; विलास रहाटेंचा अनोखा कलाविष्कार

भावार्थ रामायणाचा विवेचक अभ्यास असा

वसंत जोशी यांनी एकनाथ जीवनः शोध आणि बोध, एकनाथ युग, रामकथेची निर्मिती व स्थित्यंतरे, वाल्मीकि रामायण व भावार्थ रामायणः तौलनिकअभ्यास भावार्थ रामायण व मराठी रामकथा, भावार्थ रामायणः प्रेरणा व रचना, काव्यविशेष, लेखनाची प्रेरणा, परमार्थ विचार, अहिरावाणाख्यान, उत्तरकांडाची समस्या या पैलूंतून विवेचक अभ्यास केला आहे.

‘अध्यात्म रामायणा’च्या विविध मुद्यांवर संशोधन

अंजली पर्वते यांनी अध्यात्म रामायणः कर्तृत्व आणि काळ, मूलस्त्रोत वाल्मिकी रामायण आणि अध्यात्म रामायण, अन्य रामायणे-कथानकांचा तौलनिक अभ्यास, तत्वज्ञानाचे स्वरूप, तुलनात्मक विचार, वाड्मयीन अभ्यास या मुद्यांवर संशोधनात्मक अभ्यास केला आहे.

Ramayana Shivaji University
प्रतापगड किल्ल्याच्या विकासासाठी पुन्‍हा नवीन आराखडा; उपमुख्यमंत्री अजितदादांचा पुढाकार, काय आहे प्रस्ताव?

रामायणांचा तुलनात्मक अभ्यास

प्रा. टी. पी. उपाध्ये यांनी वाल्मिकी रामायण, अवतार कल्पना, रामावतार, त्यावरील महत्त्वाचे संस्कृत साहित्य, प्राचीन मराठी रामायणीय काव्यरचनेतील प्रवाह, बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्ध आणि उतरकांड यांचा अभ्यास केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com