ayodhya ram mandir pran pratishtha ramlala idol first look garbh grah by arun yogiraj marathi news  
देश

Ayodhya Ram Mandir : गर्भगृहात विराजमान प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला फोटो आला समोर

Ayodhya Ram Mandir Update : अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून निमंत्रण पत्र देखील पाठवण्यात आले आहेत

रोहित कणसे

अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून निमंत्रण पत्रिका देखील पाठवण्यात आले आहेत. देशभरातून या सोहळ्याची वाट पाहिली जात आहे. यापूर्वी १८ जानेवारी रोजी गर्भगृहात प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. ज्याचा पहिला फोटो देखील समोर आला आहे.

अयोध्येत विराजमान होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. गर्भगृहातील या फोटोमध्ये मंदिराचे बांधकाम करणारे कामगार हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची ही मूर्ती म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. या मूर्तीची उंची ५१ इंच इतकी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मूर्तीला आसनावर स्थापन करण्यासाठी तब्बल चार तासांचा वेळ लागला. मंत्रउच्चार विधी आणि पूजा केल्यानंतर मूर्ती आसनावर विराजमान झाली. यावेळी मूर्तीकार आणि अनेक भाविक देखील उपस्थित होते.

बुधवारी रात्री क्रेनच्या साहाय्याने राम मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली. त्याचे फोटो देखील समोर आली आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी त्यांचे आसनही तयार करण्यात आले आहे. रामलल्लाचे आसन ३.४ फूट उंच आहे, जे मकराना दगडाने बनलेले आहे. 

अयोध्योत बांधण्यात आलेल्या मंदिरात ठेवण्यासाठी तीन मूर्तीकार मूर्तीवर काम करत होते. या तीन पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली होती. ही मूर्ती म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. दरम्यान १६ तारखेपासूनच राम मंदिरात विविध पूजा विधींची सुरुवात झाली आहे. होम-हवन पार पाडले जात आहेत. २२ तारखेला तर भव्य सोहळा भारतीयांना पाहायला मिळेल. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस, पाणी सलाईन घेण्यास नकार

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

Miami Airport Plane Crash : ॲमेझॉनचं विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरलं अ्न रस्त्यावर आलं, वाहनांना धडक; ५ जणांचा मृत्यू

पुन्हा पुन्हा तेच चेहरे पाहून कंटाळली तापसी पन्नू? बॉलीवूडच्या कास्टिंगवर तापसी पन्नूची टीका करत म्हणाली, 'रोमँटिक कॉमेडीत तेच...'

SCROLL FOR NEXT