Ayodhya Ram Mandir: अखेर राम लल्ला घरात आले! चार तासानंतर गर्भगृहात विराजमान

राम लल्लाची मूर्ती चार तासांच्या प्रयत्नानंतर मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झाली आहे. बुधवारी रात्री राम लल्लाची मूर्ती मंदिरात आणण्यात आली होती. त्यानंतर आज राम लल्ला गर्भगृहात विराजमान झाले आहेत.
Ram Lalla idol installed in Ayodhya temple complex after over 4 hours
Ram Lalla idol installed in Ayodhya temple complex after over 4 hourssakal
Updated on

नवी दिल्ली- राम लल्लाची मूर्ती चार तासांच्या प्रयत्नानंतर मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झाली आहे. बुधवारी रात्री राम लल्लाची मूर्ती मंदिरात आणण्यात आली होती. त्यानंतर आज राम लल्ला गर्भगृहात विराजमान झाले आहेत. राम लल्लांची मूर्ती आपल्या घरी आली अशी भावना लोकांमध्ये आहे. (Ram Lalla idol installed in Ayodhya temple complex after over 4 hours)

बुधवारी रात्री राम लल्लांची विशेष पूजा करुन राम मंदिरात आणण्यात आले होते. आज त्यांना गर्भगृहात ठेवण्यात आले आहे. काळजी घेऊन मूर्तीला नियोजित जागी ठेवण्यात आले. २२ जानेवारीला राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम लल्लासाठी तीन मूर्ती निवडण्यात आल्या होत्या, त्यातील एका मूर्ती नक्की करण्यात आली होती. तीच मूर्ती आज विराजमान झाली.

Ram Lalla idol installed in Ayodhya temple complex after over 4 hours
Udhayanidhi: सनातननंतर उदयनिधी यांचा राम मंदिराला विरोध; वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता

तमाम भारतीयांसाठी राम मंदिरातील राम लल्लाची प्रतिष्ठापणा हा जिवाळ्याचा आणि भावनिक विषय आहे. त्यामुळे २२ जानेवारीची भारतीय उत्सुकतेने वाट पाहात आहेत. खरे म्हणजे १६ तारखेपासूनच राम मंदिरात विविध पूजा विधींची सुरुवात झाली आहे. होम-हवन पार पाडले जात आहेत. २२ तारखेला तर भव्य सोहळा भारतीयांना पाहायला मिळेल. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल.

राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात लोक हे प्रक्षेपण पाहण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड या पाच राज्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळा-कॉलेज, कार्यालये देखील बंद ठेवण्यात येणार आहेत.

Ram Lalla idol installed in Ayodhya temple complex after over 4 hours
राम मंदिर सोहळ्याला 'कोका कोला अन् हाजमोला'! काय आहे हे प्रकरण? अदानी अंबानींचही खास कनेक्शन

सोहळ्यानिमित्त दिवसभरात देशाच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक भागात रॅली काढल्या जाणार आहेत. लोक उत्स्फुर्तपणे यात भाग घेतील. रात्रीच्या वेळी घराघरांत दीप प्रज्वलन केले जाणार आहे. अशाप्रकारे २२ जानेवारीला सर्व भारत देश 'राममय' होणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Yogi Government Announces Mega Flower Centre Project for Ayodhya Temples
Ayodhya Ram Temple Seeks Priests: Strict Eligibility Criteria and Rules Explained
Mandatory Documents: Aadhar Card and Family Pass Rules for Ayodhya Pilgrimage
Royal Comfort: AC and Coolers Installed to Keep the 5-Year-Old 'Balak' Ram Lalla Cool
Marathi News Esakal
www.esakal.com