Bihar  Team eSakal
देश

बिहारमध्ये जमावानं पोलीस स्टेशनसह वाहनं पेटवली; एका पोलिसाचा मृत्यू

जीव वाचवून पळणाऱ्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक

सुधीर काकडे

बेतिया: बिहारमधील पश्चिम चंपारणमधील बेतियामध्ये काल एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीचा कोठजीत मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने थेट पोलीस स्टेशनलाच आग लावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीसांवर देखील हल्ला करण्यात आल्याचं समजतंय.

कोठडीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस स्टेशनजवळ हा जमाव जमला होता. डीजे वाजवल्याप्रकरणी पोलीसांनी मृत व्यक्तीला ठाण्यात आणल्याचं सांगण्यात येतंय. यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी थेट पोलीस ठाण्यावर हल्ला करत आग लावली.

संतप्त जमावाने यावेळी आजूबाजूला उभ्या असणाऱ्या वाहनांना देखील आग लावली. यावेळी पोलीस आपला जीव वाचवण्यासाठी ठाण्यातून पळून गेले. त्यानंतर जमावाकडून पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आली. या घटनेत एका पोलिसाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट

Team India New Coach: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम बदलली, आता कोचही बदलणार, गौतम गंभीरचा पत्ता कट ? नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Teachers Protest: महाराष्ट्रातील शिक्षक आक्रमक! ९ जुलैला शाळा बंद ठेवणार; आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन, कारण काय?

लग्नानंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार रिचा-अली; सोशल मीडियावर पोस्ट करत केली नव्या चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT