देश

Nitish Kumar Politics: नितीश कुमार यांचा खेला होणार ? भाजप नेत्याने घेतली 'किंगमेकर'ची भेट, मुख्यमंत्री पदाची ऑफर

सध्या बिहारमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच राजकीय पक्षांच्या बैठकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

Manoj Bhalerao

Samrat Choudhary meets Jitan Ram Manjhi: सध्या बिहारमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. नीतिश कुमार यांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राजकीय गोंधळ निर्माण झालेला असताना भाजपचे जेष्ठ नेते सम्राट चौधरी यांनी हिंदुस्तान आवामी मोर्चाच्या जीतम राम मांझी यांची भेट घेतली.

केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी मांझी यांच्यासोबत चर्चेला सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे आमदारही उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. बिहारच्या राजकारणात जीतन राम मांझी हेच किंगमेकर राहणार, अशी चिन्ह दिसतं आहेत. सुत्रांकडून माहिती मिळतीय की मांझी यांना राजदकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे.

RJDने मांझी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. या ऑफरमुळे भाजप प्रदेशाध्यक्षांनी मांझी यांची भेट घेतली. चौधरी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मांझी यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवली. जीतन राम मांझी यांच्या पक्षाचे सध्या ४ आमदार आहे. दोन्ही पक्षांकडून देण्यात आलेल्या ऑफरनंतर मांझी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Latest Marathi News)

नित्यानंद राय यांनीही भेट घेतली

सम्राट चौधरी शनिवारी जितनराम मांझी यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा राजकीय चर्चांना उधाण आले. एनडीएतील घटक पक्षांना बळ देण्यासाठी बैठकांची ही फेरी सुरू असल्याचे मानले जात आहे.

दिल्लीतील अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपल्यानंतर मंत्री नित्यानंद राय हे गुरुवारी रात्री जीतन राम मांझी यांना भेटायला आले. दरम्यान, आरजेडीने जीतन राम मांझी यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र, जीतन राम मांझी यांनी ही अफवा असल्याचे सांगत एनडीएसोबत असल्याचा दावा केला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT