Bihar Political News : पलटी मारण्यापूर्वी नीतीश कुमार पोहचले मंदिरात... भाजप नेत्यासोबत केली पूजा

Bihar Political News : सध्या बिहारची राजधानी पटना येथे राजकिय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. यादरम्यान नीतीश कुमार शनिवारी बक्सरच्या ब्रम्हपूर मंदिरात गेले होते.
Bihar Political News
Bihar Political News

Bihar Political News : बिहारमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री नीतीश कुमार बक्सरमध्ये भाजप खासदार अश्विनी चौबे यांच्यासह ब्रम्हपूर मंदिरात पूजा-अर्चना करताना दिसून आले.

सध्या बिहारची राजधानी पटना येथे राजकिय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. यादरम्यान नीतीश कुमार शनिवारी बक्सरच्या ब्रम्हपूर मंदिरात गेले होते. येथे त्यांनी पूजा केली. सोबतच मंदिराच्या पुनरुज्जीवनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या योजनांची पायाभरणी देखील केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते अश्विनी कुमार चौबेही सोबत होते.

सीएम नीतीश कुमार यांच्यासोबत ब्रम्होश्वरनाथ धाम मंदिरात उद्घाटन खेल्यानंर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे म्हणाले की, जी देवाची इच्छा असेल तेच होईल... पहिल्यांदा मी त्यांना (नीतीश कुमार) येथे घेऊन आलो होते आणि आजही मीच त्यांना घेऊन आलो आहे.

Bihar Political News
Manoj Jarange Family : ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड... विजयानंतर जरांगे पाटलांच्या मुलाची भावुक प्रतिक्रिया

दुसरीकडे पटना येथे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे देखील पटना येथे पोहचले आहेत. तावडे आज संध्याकाळी भाजपच्या विधीमंडळ गटाच्या बैठकीत सहभागी होतील. तसेच एनडीएतील एकोपा जपून ठेवण्यासाठी सम्राट चौधरी जीतन राम मांझी यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा देखील केली.

सूत्रांच्या माहितीनुसार बक्सर येथूल पटना परतल्यानंतर नीतीश कुमार त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात आणि त्यानंतर ते भाजपच्या समर्थन घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात.

Bihar Political News
Maratha Reservation : सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? कोणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? GR मध्ये करण्यात आलं स्पष्ट

बिहारमध्ये राजकीय अस्थिरात पाहायला मिळत असताना, आरजेडीकडून सर्व शक्यता तपासने सुरू आहे. यादरम्यान मुख्यमंत्री नीतीश कुमार एनडीएमध्ये सहभागी होण्यापूर्वी भाजप आणि आरजेडी यांची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिहार विधानसभेत सध्या भाजपकडे ७८ विधानसभेच्या जागा आहेत, तर जेडीयूकडे ४५ आमदार आहेत. तर एनडीएचा मित्रपक्ष एचएएमचे ४ आमदार आहेत. हे सर्व एकत्र आल्यास आकडा १२७ होतो. आरजेडीने जेडीयूच्या काही आमदारांचा तोडण्यात आले तर काँग्रेसचे १० बंडखोर आमदार नितीश आणि भाजपचे सरकार स्थापन होण्यात महत्वाची भूमिका निभावू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com