yogi adityanath sakal
देश

UP निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, योगींचा मतदारसंघ ठरला

ओमकार वाबळे

यावर्षी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. यामध्ये सर्वात मोठं राज्य म्हणजे उत्तर प्रदेशच्या देखील निवडणुका आहेत. सात टप्प्यात पार पडणाऱ्या निवडणुकांसठी काँग्रेसने पहिल्यांदा 125 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. (Uttar Pradesh Election 2022)

त्यानंतर सपा आणि बसपाची यादी देखील आली आहे. त्या मागोमाग लगेच भारतीय जनता पार्टीची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये ५७ नावांचा समावेश आहे. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघावरही शिक्कामोर्तब झालं आहे.पहिल्या टप्प्यात 57/58 आणि दुसऱ्या टप्प्यात 38/55 जागांवर उमेदवारांची यादी जाहीर करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर त्यांच्यासाठी गोरखपूर शहर हा मतदारसंघ राखीव करण्यात आला आहे. योगी याआधी गोरखपूरच्या पारंपारिक मतदरासंघातून संसदेत जात होते. त्यांच्याशी संबंधित मठाचा हा मतदारसंघ आहे. आता विधानसभेला देखील ते याच ठिकाणाहून निवडणूक अर्ज भरणार आहेत. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे प्रयागराज जिल्ह्यातील सिरथू मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत.

पाच राज्यांसाठी निवडणुकांचं बिगूल

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांत निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. येत्या काळात या राज्यांत विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2022) पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी तब्बल 690 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. मात्र या निडणुकांमध्ये कोरोनाचंही निवडणूक आयोगासमोर आव्हान(Election Commission of India) आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज निवडणून आयोग महत्वाचा निर्णय जाहीर करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT