UP Election : बसपचे पहिल्या टप्प्यासाठी ५३ उमेदवार निश्चित; मायावती म्हणाल्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मायावती

बसपचे पहिल्या टप्प्यासाठी ५३ उमेदवार निश्चित; मायावती म्हणाल्या...

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका (UP Election) होऊ घातल्या आहेत. बहुजन समाज पक्षाने (Bahujan Samaj Paksha) पहिल्या टप्प्यात ५८ पैकी ५३ जागांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. बीएसपी सुप्रीमो मायावती (Mayawati) यांनी वाढदिवसानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. इतर पाच जागांचाही निर्णय दोन ते तीन दिवसांत होईल, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ (UP Election) साठी पहिल्या टप्प्यातील ५८ पैकी ५३ जागांनी (53 candidates confirmed for first phase) मायावती यांनी उमेदवार निश्चित केले आहेत. माझ्याविरोधात मीडियाला कोणताही मुद्दा मिळत नाही. त्यामुळे ते रोज माझ्या निवडणुका लढवल्याचा मुद्दा उपस्थित करीत आहेत, असे स्वतः विधानसभा निवडणूक लढवल्याच्या वृत्तावर मायावती (Mayawati) यांनी सडेतोड उत्तर दिले.

हेही वाचा: ‘१६ जानेवाही हा ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’; स्टार्टअप्स हा नव्या भारताचा कणा’

मी चारवेळा लोकसभा आणि तीनवेळा राज्यसभेची सदस्य राहिली आहे. पक्षाच्या हितासाठी थेट निवडणूक लढविण्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांना विजयी करण्यासाठी काम करणार आहे. आपल्या राज्यघटनेत अशी तरतूद आहे की, निवडणूक न लढवताही स्वत:च्या गुणवत्तेवर कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री होता येते, असेही मायावती (Mayawati) म्हणाल्या.

२००७ प्रमाणे बसप सत्तेत येईल

लोक आकाश आनंद निवडणूक लढवणार असल्याची बातमी मीडियामध्ये पसरवत आहे. मात्र, ते माझ्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या कामात गुंतले आहेत. मीडिया आणि विरोधी पक्ष आकाश आनंदच्या मागे लागले तर मी माझ्या पक्षात त्याचा अधिक प्रचार करेन. आकाश आनंद आणि सतीश चंद्र मिश्रा यांचा मुलगा कपिल मिश्राही तरुणांना बसपाशी जोडण्यात गुंतला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की २००७ प्रमाणे यावेळी बसप पुन्हा सत्तेत येईल, असेही मायावती (Mayawati) म्हणाल्या.

हेही वाचा: ‘...मृत्यूचे शिकार बनू नका’ असं म्हणणाऱ्याला मुंबई महापालिकेचे उत्तर

कोणाशीही युती नाही

मायावती यांनी बसपची (Bahujan Samaj Paksha) कोणत्याही पक्षाशी युती नसल्याचे जाहीर केले. सर्व समाजाच्या आघाडीने आमचा पक्ष विजयी होईल, असे मायावती म्हणाल्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top