congress 
देश

Congress: या मतदारसंघात काँग्रेस करतंय चक्क 'नोटा'चा प्रचार, काय आहे कारण?

Congress props up NOTA: काँग्रेसचे इंदौर लोकसभेचे उमेदवार अक्षय कांती बाम यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली

कार्तिक पुजारी

भोपाळ- इंदौर लोकसभा मतदारसंघाच्या ( Indore lok sabha 2024) शर्यतीतून काँग्रेस बाहेर पडली असली तरी पक्षाकडून एक वेगळी रणनीती अवलंबली जात आहे. काँग्रेसचे इंदौर लोकसभेचे उमेदवार अक्षय कांती बाम यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाले. त्यामुळे भाजपसाठी ही लढाई सोपी झाली आहे. पण, काँग्रेस सहजासहजी शस्त्र खाली ठेवण्यास तयार नाही.

इंदौरच्या लोकांनी 'नोटा' म्हणजेच यापैकी कोणीही नाही याला मत द्यावे यासाठी काँग्रेसकडून तयारी सुरु आहे. इंदौर लोकसभा मतदारसंघामध्ये चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने एकप्रकारे 'नोटा'साठी प्रचार सुरु केला आहे. ठिकठिकाणी छोटी आंदोलनं, बैठका, कँडल मार्च आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी नोटाला मतदान करावं यासाठी काँग्रेसने जोर लावला आहे.

इंदौरमध्ये भाजपसमोर कोणाचे आव्हान नाही. भाजपचे विद्यमान खासदार आणि यावेळीही तिकीट मिळालेले शंकर ललवानी यांना विजयाचा पूर्ण विश्वास आहे.काँग्रेस मैदानात नसली तरी १३ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. असे असले तरी इंदौरमध्ये निवडणूक एकतर्फीच होण्याची दाट शक्यता आहे. पण, काँग्रेसने निषेध म्हणून लोकांना नोटाला मत देण्याचे आवाहन केले आहे.

इंदौर हा मध्य प्रदेशातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. मतदारसंघात २५.१३ लाख मतदार आहेत. १९८९ पासून इंदौरवर भाजपचाच ताबा राहिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला ३१ टक्के मत मिळाली होती. इंदौरमध्ये १३ अपक्ष उमेदवार असल्याने आणि त्यांनी माघार घेतली नसल्याने सुरतसारखी बिनविरोध निवडणूक इथे होणार नाही.

मतदारसंघातील स्थिती पाहता भाजपने इथे खर्चासाठी हात आखडता घेतला आहे. प्रचाराचा जोर देखील कमी आहे. भाजपला मतदारसंघात मोठ्या विजयाची खात्री आहे. भाजपचे प्रवक्ते अलोक दुबे म्हणाले की, ''भाजपचा विजय होईल यात कसलीच शंका नाही.पण, काँग्रेस नोटाला समर्थन देऊन नकारात्मक राजकारण करत आहे. लोकशाहीवरील हा हल्ला आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT