PM Modi: 'काँग्रेस देशाला पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती दाखवत आहे..', PM मोदी यांचे टीकास्त्र

PM Modi: मणिशंकर अय्यर यांच्या कंधमाल, ओडिशातील वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींनी त्यांचे नाव न घेता काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi esakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातील कंधमाल येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, मी भाग्यवान आहे की कंधमालमध्ये येताच मला असे आशीर्वाद मिळाले, जे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. हा आशीर्वाद संपूर्ण देशात होत असलेल्या बदलाचे खरे उदाहरण आहे.

पोखरण अणुचाचणीचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले, '२६ वर्षांपूर्वी याच दिवशी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती. देशभक्तीने ओतप्रोत असलेले सरकार राष्ट्रहितासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी आणि देशातील जनतेला आशा-अपेक्षा देण्यासाठी कसे कार्य करते हे आम्ही दाखवून दिले होते.

अय्यर यांच्या वक्तव्यावरून मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा

मणिशंकर अय्यर यांचे नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले, 'एक दिवस असा होता जेव्हा भारताने जगाला आपल्या क्षमतेची ओळख करून दिली होती. दुसरीकडे काँग्रेस आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करते आहे.

PM Narendra Modi
'भारताने पाकिस्तानचा सन्मान करावा, नाहीतर ते अणुबॉम्ब टाकतील'; काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'काँग्रेसच्या या कमकुवत वृत्तीमुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांनी 60 वर्षांपासून दहशतीचा सामना केला आहे. देशाला किती दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला? दहशतवाद्यांना धडा शिकवण्याऐवजी हे लोक दहशतवादी संघटनांच्या बैठका घेत असत, हे देश विसरू शकत नाही. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस या लोकांमध्ये नव्हते का? कारण आम्ही कारवाई केली तर आमची व्होट बँक नाराज होईल, असे काँग्रेस आणि भारत आघाडीला वाटत होते, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला आहे.

PM Narendra Modi
Palestine: पॅलेस्टाइनला 'UN'चा सदस्य होण्यासाठी 143 देशांचा पाठिंबा, जाणून घ्या भारताने काय घेतली भूमिका

काय म्हणाले होते मणिशंकर अय्यर?

मणिशंकर अय्यर एका मुलाखतीमध्ये बोलत होते. यात ते म्हणाले की, ''भारताने पाकिस्तानचा सन्मान केला पाहिजे. कारण आपल्या शेजारी राष्ट्राकडे अणुबॉम्ब आहे. आपण त्यांचा सन्मान राखला नाही तर ते अणुबॉम्ब हल्ला करण्याचा विचार करु शकतात.'' अय्यर यांच्या या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला टीकेसाठी मुद्दा मिळाला आहे. भाजप नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

अय्यर म्हणाले की, ''पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे हे आपण विसरुन चालणार नाही. मला कळत नाही विद्यमान सरकार असं म्हणते की, तिथे दहशतवाद असल्याने आम्ही पाकिस्तानशी बोलणार नाही. दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा महत्त्वाची आहे. अन्यथा पाकिस्तानला वाटेल की, भारत अहंकारामुळे आम्हाला जगात छोटं दाखवत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधला कोणताही वेडा माणूस अणुबॉम्बचा वापर करु शकतो.''


PM Narendra Modi
Sitapur Murder Case: चिमुरड्यांना छतावरून फेकलं, आईवर झाडली गोळी अन् बायकोला हातोड्यानं..; सीतापुरात 5 जणांची निर्घृण हत्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले आवाहन

लोकांना आवाहन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, विकसित भारतासाठी विकसित ओडिशा करण्यासाठी तुमचे मत महत्त्वाचे आहे. तुमचे एक मत इथे डबल इंजिनचे सरकार आणू शकते. कमळाचे बटण दाबा आणि आमच्या उमेदवाराला विजयी करण्यात मदत करा.

PM Narendra Modi
10th Student : लग्न रद्द झाल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थिनीचे चाकूने डोके छाटून, शरीराचे तुकडे करुन निर्घृण खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com