BJP MP Ramesh Bidhuri made offensive remarks  
देश

BJP MP: रमेश बिधुरी वादग्रस्त वक्तव्य करत असताना केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन हसत होते; 'भाजपची मानसिकता दिसली'

कार्तिक पुजारी

BJP MP Ramesh Bidhuri made offensive remarks

नवी दिल्ली- भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी शुक्रवारी बसपा खासदाराबाबत बोलताना अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. त्यामुळे देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. लोकसभेमध्ये चांद्रयान-३ बाबत चर्चा केली जात होती. दानिश अली यांच्यावर टीका करताना बिधुरी यांची जीभ घसरली. विशेष म्हणजे बिधुरी वादग्रस्त वक्तव्य करत असताना त्यांच्या पाठीमागे बसलेले केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद हे हसत असल्याचे दिसले.

दक्षिण दिल्लीचे प्रतिनिधित्व करणारे बिधुरी यांनी याआधीही असंसदीय शब्दांचा वापर केलेला आहे. त्यांच्या नव्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नव्या संसद भवनात अशा प्रकारची सुरवात शरमेची बाब असल्याचं म्हणण्यात आलंय. रमेश बिधुरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

माहितीनुसार, लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी बिधुरी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी संसदेची प्रतिष्ठा राखण्याच्या सूचना खासदाराला दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनीही रमेश बिगुरी यांच्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला आहे. संसदीय कामकाजातून बिधुरी यांचे वक्तव्य वगळले जाण्याची शक्यता आहे.

विरोधकांकडून कारवाईची मागणी

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मौईत्रा यांनी ओम प्रकाश बिर्ला यांच्याकडे यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे. रमेश बिधुरी यांच्यावर काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी 'एस्क' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, 'बिगुरी यांच्या वक्तव्यामुळे भाजपची मुस्लिमांबाबत असलेली मानसिकता दिसून आली.'

महाराष्ट्र काँग्रेसनेही या प्रकरणात भाष्य केलं आहे. एकीकडे नवीन संससेची उभारणी आणि दुसरीकडे भाजप खासदाराने भाषेची पातळी ओलांडली. नक्कीच भाजप खासदाराचे प्रोमोशन होईल, अशी टिप्पणी काँग्रेसने केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT