Up gangrape 
देश

पाय, बरगडी तोडली, फुप्फुसावरही घाव; सामुहिक बलात्कारानंतरच्या मृत्यूने UP पुन्हा हादरलं

सकाळवृत्तसेवा

लखनऊ : माणुसकीला काळीमा फासेल अशी घटना पुन्हा एकदा घडली आहे. हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सामुहिक बलात्काराच्या एका नृशंस अशा घटनेने हादरला आहे. दिल्लीतील 'निर्भया' प्रकरणाची आठवण करुन देणारी ही घटना घडलीय उत्तर प्रदेश मधील बदायू जिल्ह्यामध्ये. एका मध्यमवयीन महिलेवर सामुहिक बलात्कार करुन तिला ठार मारण्यात आलं आहे. याबाबतची तक्रार बदायू जिल्ह्यातील उघैती या छोट्या गावातील पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गेल्या रविवारी संध्याकाळी मंदिरात गेली होती. मात्र, ती परतलीच नाही. 

गावातील स्थानिकांनी आरोप केलाय की, रात्री 12 च्या सुमारास या रक्तबंबाळ अवस्थेतील पीडितेला टाकून दोन इसमांसहित असलेल्या एका कार चालकाने पोबारा केला. त्यानंतर मध्यरात्री तिचं निधन झालं. नंतर हे देखील स्पष्ट झालं की या घटनेतील आरोपींनी तिला कारमधून चंदौसी येथे उपचारांसाठी नेलं होतं.

या घटनेतील पीडितेच्या नातेवाईकांनी आरोप केलाय की, तक्रार दाखल करुनही उघैती पोलिस स्टेशनचे ऑफिसर रविंद्र प्रताप सिंह हे वेळेवर पोहोचले नाहीत. या पीडितेचा मृतदेह मृत्यूनंतर तब्बल 18 तासांनी म्हणजे सोमवारी दुपारी पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. मंगळवारी आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, या पीडितेच्या गुप्तांगांच्या ठिकाणी अनेक जखमा आढळून आल्या आहेत. या महिलेची बरकडी तसेच पाय मोडला होता. तसेच तिच्या फुप्फुसावर जोरदार हल्ला करण्यात आला होता. तसेच तीव्र रक्तस्त्राव देखील होत होता.

पोलिसांनी याबाबत सामुहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी चार जणांची टीम बनवली आहे. या घटनेतील संशयित आरोपी महंत बाबा सत्यनारायण, त्याचा सहाय्यक वेदराम आणि ड्रायव्हर जसपाल यांचा शोध सुरु आहे. अद्याप एकही अटक झालेली नाहीये. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT