BS Yediyurappa esakal
देश

Karnataka : PM मोदींचा दौरा होताच माजी मुख्यमंत्र्यानं केली निवृत्तीची घोषणा; राजकीय चर्चांना उधाण

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

येडियुरप्पा सध्या भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीचे सदस्य आहेत. त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली असली तरी त्यांनी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

बंगळुरु : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी (Karnataka Assembly Election) माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी मोठी घोषणा केलीये.

येडियुरप्पांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना येडियुरप्पांनी ही घोषणा केल्यामुळं चर्चांना उधाण आलंय.

येडियुरप्पा सध्या भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीचे सदस्य आहेत. त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली असली तरी त्यांनी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

माध्यमांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले, “मी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीये. तसंच भविष्यात कोणतीही निवडणूक लढवण्याचा माझा विचार नाहीये. मी आता 80 वर्षांचा असल्यामुळं यापुढं मी निवडणूक लढवू शकत नाही. मात्र, यापुढं आपण सक्रिय राजकारणात राहणार असून, राज्यात पुन्हा भाजपचं सरकार आणणं हेच आपलं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT