Karnataka : देशातल्या प्रत्येकानं आपलं जीवन पंतप्रधान मोदींप्रमाणं जगावं; असं का म्हणाले अमित शाह?

आगामी निवडणुका (Karnataka Election) लक्षात घेऊन शाह कर्नाटक दौऱ्यावर असल्याचं मानलं जात आहे.
Amit Shah Karnataka Visit Karnataka
Amit Shah Karnataka Visit Karnatakaesakal
Summary

कर्नाटकातील हुबळी-धारवाड आणि बेळगाव इथं पक्षानं आयोजित केलेल्या रोड शोसह विविध कार्यक्रमांमध्ये शाह सहभागी होणार आहेत.

Amit Shah Karnataka Visit : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. हुबळीतील कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान मोदींचं (PM Modi) जोरदार कौतुक केलं.

बीव्हीबी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 'अमृत महोत्सवा'ला संबोधित करताना शाह म्हणाले, 'प्रत्येकानं आपलं जीवन पंतप्रधान मोदींप्रमाणं आपल्या देशासाठी जगलं पाहिजे आणि भारताला जगातील प्रथम क्रमांकाचा देश बनवण्यासाठी काम केलं पाहिजे.'

Amit Shah Karnataka Visit Karnataka
राहुल गांधींच्या सुरक्षेचा प्रश्न! काँग्रेस अध्यक्षांचं थेट गृहमंत्र्यांना पत्र; खर्गे म्हणाले, मी तुमचा..

आगामी निवडणुका (Karnataka Election) लक्षात घेऊन शाह कर्नाटक दौऱ्यावर असल्याचं मानलं जात आहे. कर्नाटकातील हुबळी-धारवाड आणि बेळगाव इथं पक्षानं आयोजित केलेल्या रोड शोसह विविध कार्यक्रमांमध्ये शाह सहभागी होणार आहेत. आपल्या दौऱ्यात गृहमंत्री बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.

Amit Shah Karnataka Visit Karnataka
Tripura Election : विधानसभेची पहिली यादी जाहीर; भाजपनं मुस्लिमांनाही दिलं तिकीट, 11 महिलांचा समावेश

भाजपतर्फे आयोजित अनेक कार्यक्रमांमध्ये शाह सहभागी होतील. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आणि पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शाह यांचा हा दौरा असणार आहे. यादरम्यान शाह कर्नाटकातील पक्षाच्या विस्तारावरही लक्ष केंद्रित करतील आणि नवी रणनीती आखू शकतात, असं बोललं जातंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com