High Court 
देश

High Court: पाकिस्तानमध्ये जाऊन नोकरी केल्यास तो 'शत्रू' ठरतो का? हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Kerala HC on property case: न्यायमूर्ती विजू अब्राहम यांच्या पीठाने यासंदर्भातील निर्णय दिला आहे. भारताच्या सुरक्षा नियमांनुसार तो शत्रू ठरत नाही असं कोर्टानं म्हटलंय.

कार्तिक पुजारी

कोची- एखादा व्यक्ती नोकरीच्या शोधात पाकिस्तानमध्ये जाते आणि त्याठिकाणी काम करायला लागते म्हणजे तो 'शत्रू' होत नाही, असं केरळ हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती विजू अब्राहम यांच्या पीठाने यासंदर्भातील निर्णय दिला आहे. भारताच्या सुरक्षा नियमांनुसार तो शत्रू ठरत नाही असं कोर्टानं म्हटलंय.

मलापुरमच्या उमर कोया यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. शत्रू संपत्ती कायदा १९६८ अंतर्गत वडिलांची संपत्ती घोषित करू नये या मागणीसाठी कोया यांनी कोर्टात धाव घेतली होती. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

केरळा पोलीसमधील निवृत्त कर्मचारी कोया यांनी याचिकेमध्ये सांगितलं होतं की, त्यांचे वडील कुंजी कोया हे १९५३ मध्ये कामाच्या शोधात पाकिस्तानच्या कराचीमध्ये गेले होते. त्याठिकाणी एका हॉटेलमध्ये ते काहीकाळ वेटर म्हणून काम करत होते. त्यानंतर ते भारतात परत आले आणि वयाच्या ९३ व्या वर्षी, १९९५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

कोया २०२२-२३ मध्ये प्रोपर्टी टॅक्स देण्यासाठी VO अधिकाऱ्याकडे गेले होते, पण त्याने ते नाकारले. तहसीलदारांनी दिलेल्या सुचनेनुसार शत्रूंची संपत्ती असलेल्या मालमत्तेवर कर गोळा न करण्याच्या सूचना मिळाल्या असल्याचं VO अधिकाऱ्याने कोया यांना सांगितलं.

कोया यांच्या वडिलांना सुरक्षा यंत्रणांनी संशयित गृहित धरलं होतं. ते पाकिस्तानी नागरिक असल्याचं म्हणत शत्रू संपत्ती कायदा १९६८ अंतर्गत त्यांच्या संपत्तीला शत्रू संपत्ती जाहीर करण्यात आलं होतं. यासंदर्भात कोया यांना पोलिसांकडून त्रास दिला जात होता. त्यांनी केंद्र सरकारकडे देखील याची तक्रार केली होती. पण, त्याचा काही फायदा झाला नाही. त्यानंतर कोया यांनी हायकोर्टात धाव घेतली.

कोर्टाने निर्णयात काय म्हटलं?

शत्रू संपत्ती कायदा १९६२ आणि १९७१ अंतर्गत कुंजी कोया येत नाहीत. कारण, ते भारतीय नागरिक आहेत. त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व घेतलेले नाही. याशिवाय यंत्रणांकडे कुंजी यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असं कोर्टाने स्पष्ट करत संपत्तीवर कर जमा करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT