Karti Chidambaram_CBI Raid 
देश

कार्ती चिदंरबरम यांच्या निवासस्थानी CBIची छापेमारी

यापूर्वीही सीबीआयनं त्यांच्याशी संबंधीत विविध राज्यांतील ९ ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या.

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांच्या निवासस्थानी केंद्रीय अन्वेशन ब्युरोनं अर्थात सीबीआयनं छापेमारी केल्याचं वृत्त आहे. चेन्नई येथील त्यांच्या घरी सीबीआयचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे ते पुत्र आहेत. (CBI officials raid Congress leader Karti Chidambaram residence in Chennai)

यापूर्वीही कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित ९ ठिकाणांवर सीबीआयनं धाडी टाकल्या होत्या. २५० चिनी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी ५० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मे महिन्यात याच प्रकरणी ईडीनेही कार्ती चिदंबरम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

चिदंबरम यांच्या महत्वाच्या ९ ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय भास्कर रमण यांना व्हिसा भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयनं अटक केली होती. दरम्यान, यापूर्वीही लाखो रुपये घेऊन व्हिसा तयार करण्याच्या प्रकरणात सीबीआयनं कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित मालमत्तांवर कारवाई केली होती. कार्ती चिदंबरम यांनी चिनी कंपन्यांमधील लोकांना आपली खास ओळख वापरुन व्हिसा दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.

मागील छाप्यादरम्यान, सीबीआयने यासंदर्भात कार्ती चिदंबरम आणि वडील पी. चिदंबरम यांच्या चेन्नई, मुंबई, तामिळनाडू, पंजाब, दिल्ली, ओरिसा येथील सुमारे 9 ठिकाणांवर छापे टाकले होते. सध्या कार्ती चिदंबरम यांची अनेक गुन्ह्यांशी संबंधित चौकशी सुरु आहे. यामध्ये एअरसेल-मॅक्सिस डील आणि INX मीडियाला 305 कोटी रुपयांचा परदेशी निधी प्राप्त करण्यासाठी विदेशी गुंतवणूक मंडळाच्या मंजुरीशी संबंधित प्रकरणाचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT