बंडखोरीची दहा कारणं देत संजय राऊत शिंदे गटावर बरसले!

sanjay raut
sanjay rautSakal

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर ते अधिकच सक्रिय झाले आहेत. बंडखोरांच्या विरोधात आता आक्रमक भूमिका घेत राऊत जोरदार टीकाही करत आहेत. नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी बंडाची दहा कारणं देत बंडखोरांना टोला लगावला आहे. (Sanjay Raut News)

sanjay raut
हनुमान आमचा, गदा आमची अन् तशी शिवसेना आमची- संजय राऊत

बंडखोरांमध्ये एकमत नाही. त्यांनी बाहेर पडण्यासाठी अनेक वेगळी कारणं दिली असल्याचं सांगत राऊतांनी थेट कारणांची यादीच वाचून दाखवली आहे. राऊत म्हणाले की, त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी म्हणाले की राष्ट्रवादीचे लोक निधी देत नव्हते, म्हणून बाहेर पडलो.तिसऱ्या दिवशी सांगितलं की उद्धव ठाकरे भेटीची वेळ देत नव्हते, म्हणून बाहेर पडलो. चौथ्या दिवशी म्हणाले आदित्य ठाकरे जास्त ढवळाढवळ करत होते म्हणून बाहेर पडलो. पाचव्या दिवशी सांगितलं की विठ्ठलाभोवती बडवे जास्त झाले म्हणून आम्ही सगळे **वे बाहेर पडलो.

sanjay raut
आम्ही लालकिल्ल्याला नव्हे तर रायगडाला सलाम करतो; राऊतांची 'शिव'गर्जना

सहाव्या दिवशी म्हणाले, संजय राऊतांमुळे आम्ही बाहेर पडलो. सातव्या दिवशी म्हणाले की शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे म्हणून बाहेर पडलो.

संजय राऊत पुढे म्हणाले की, दहाव्या दिवशी चिमणराव पाटलांनी सांगितलं की मी गुलाबरावांच्या त्रासाला कंटाळून बाहेर पडलो. त्यांनी शिवसेना वाढू दिली नाही. पण तिकडेही गुलाबराव आहेतच. मी काय म्हणतो,एकदा बसा सगळे. असा मानसिक गोंधळ करु नका आणि का बाहेर पडलो हे ठरवा. या महाराष्ट्रात डोंगर, झाडी हाटेल नाहीये का? काल पाऊस पडत होता, मी बाहेर पडलो तेव्हा पाहिलं तर मलाही वाटलं काय ती झाडी हाटेल...नाशिकला आलो तर पाहिलं की अरे इथंही सगळं एकदम ओके. तिकडे काय? ५० खोके ओके आहेत. आता दहावं कारण महत्त्वाचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com