GST latest marathi news GST latest marathi news
देश

विविध वस्तूंवर जीएसटी लावण्याचा निर्णय एकट्याने घेतला नाही - सरकार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : धान्य, दही, लस्सीसह विविध वस्तूंवर जीएसटी (GST) लावण्याचा निर्णय एकट्याने घेतलेला नाही. यासाठी विविध राज्यांच्या मंत्री गटाने सहमती दर्शवली होती, असे केंद्र सरकारने (Central Government) मंगळवारी (ता. २६) राज्यसभेत सांगितले. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी ही माहिती दिली.

लखनौ येथे झालेल्या जीएसटी (GST) कौन्सिलच्या ४५ व्या बैठकीत विविध राज्यांचे मंत्री गट (GoM) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या गटामध्ये कर्नाटक, बिहार, केरळ, गोवा, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांतील मंत्र्यांचा समावेश आहे. जीओएम एकमताने निर्णय घेते, असे पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) म्हणाले.

याआधी भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या दिल्ली, केरळ, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये अन्नधान्य, दही, लस्सी आदींवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता का, असा सवाल केला होता. बैठकीत या वस्तूंवर जीएसटी लावण्याला या राज्यांनी विरोध केला की असहमती दर्शवली होती, असा सवालही त्यांनी केला.

निर्णय घेणाऱ्या गटातील लोकांच्या मान्यतेनेच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे पंकज चौधरी म्हणाले. पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, असे निर्णय जीएसटी कौन्सिल घेतात आणि त्यात हा प्रस्ताव आला होता. हा प्रस्ताव अद्याप विचाराधीन असल्याचे चौधरी यांनी सांगितले. ‘एक राष्ट्र, एक किंमत’ या तत्त्वानुसार पेट्रोलियम पदार्थांवर एकसमान जीएसटी लागू होणार का, असा सवाल भाजपचे सदस्य अशोक वाजपेयी यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT