Challenge to OBC Reservation Act | OBC Reservation News E sakal
देश

OBC आरक्षण कायद्याला आव्हान, आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राज्य सरकारने नुकताच मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण कायदा (OBC Reservation Act) तयार केला आहे. मात्र, या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान देण्यात आले आहे. या याचिकांवर आज सुनावणी होणार असून सरकारच्या नवीन कायद्याचं काय होणार? (Challenge to OBC Reservation Act) याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, अशी सर्वपक्षीय भूमिका आहे. निवडणूक घेण्याचे अधिकार आयोगाकडे असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय होण्याची भीती राज्य सरकारला होती. तसेच सरकारला इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी वेळ पाहिजे होता. त्यामुळे सरकारने ओबीसी समाजाच्या राजकीय आक्षणासंदर्भात १९९४ पूर्वी प्रभाग रचनेचा जो अधिकारी निवडणूक आयोगाकडे होता तो राज्य सरकारकडे घेण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मांडले होते. त्यामुळे प्रभाग रचना आणि निवडणुकांच्या तारखा घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गेल्या ११ मार्चला या विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. येत्या सहा महिन्यात निवडणुका घेऊ, असं राज्य सरकारने सांगितलं होतं. तोपर्यंत मुदत संपलेल्या महापालिकांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. पण, आता या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या कायद्यावर नेमकं काय मत मांडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT