चीनचे जवान मार्शल आर्टसचा सराव करताना. (संग्रहित) 
देश

गलवानमध्ये भारतीय जवानांवर हल्ला करण्यापूर्वी चीनने आखले होते चोख नियोजन

पीटीआय

नवी दिल्ली - गलवानमध्ये भारतीय जवानांवर हल्ला करण्यापूर्वी चीनने चोख नियोजन आखले होते. या संघर्षामध्ये वेळ आलीच तर गिर्यारोहक आणि कराटेपटूंची मदत घेण्याचा त्यांचा इरादा होता. यासाठी त्यांना नजीकच्या प्रदेशात तैनात करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या चायना नॅशनल डिफेन्स न्यूज या लष्करी वर्तमानपत्रामध्ये या संदर्भातील तपशील प्रसिद्ध झाला आहे. चीनने पाच नव्या लष्करी तुकड्या आणि काही कराटेपटू तिबेटच्या ल्हासामध्ये देखरेखीसाठी नियुक्त केले होते.

या कराटेपटूंचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला असून, त्यामध्ये ते सराव करताना दिसत आहेत. तिबेटमधील चीनचे कमांडर वांग हेयजियांग यांनी या तैनातीला दुजोरा दिला असून, यामुळे लष्कराच्या सामर्थ्यामध्ये आणखी भरच पडेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, या तैनातीचा भारतासोबतच्या संघर्षाशी काहीएक संबंध होता का, यावर मात्र त्यांनी थेट भाष्य करणे टाळले. ऑलिंपिक ज्योतीच्या दौड पथकामध्ये सहभागी असलेल्या सदस्यांचाही या कराटेपटूंमध्ये समावेश होता, अशी माहिती पुढे आली आहे. भारतासोबत युद्ध झालेच, तर ते पारंपरिक पद्धतीने लढता येणार नाही याची जाणीव चीनला असल्यानेच त्यांनी विशेष कौशल्ये अवगत असणारी पथके तैनात केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT