'या' देशाचा भारताला पाठिंबा; हिंद महासागरामध्ये केला एकत्रित युद्धसराव

वृत्तसंस्था
Monday, 29 June 2020

भारत आणि जपानच्या युद्धनौकांनी हिंद महासागरामध्ये शनिवारी (ता. २७) संयुक्त सराव केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील घोषणा दोन्ही देशातील नौदल अधिकाऱ्यांनी केली आहे.

नवी दिल्ली : भारत आणि जपानच्या युद्धनौकांनी हिंद महासागरामध्ये शनिवारी (ता. २७) संयुक्त सराव केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील घोषणा दोन्ही देशातील नौदल अधिकाऱ्यांनी केली आहे. भारत आणि जपानच्या नौदलाचे संयुक्त युद्ध अभ्यास अनेकदा होत असतात. मात्र, सध्या चीन आणि भारतादरम्यान लडाखमधील सीमेवर असणाऱ्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर या युद्ध अभ्यासाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दोन्ही देशांमधील संबंध आणखीन दृढ व्हावेत या हेतूने प्रत्येक देशातील दोन याप्रमाणे चार युद्धनौकांनी युद्ध सराव केल्याचे जपानच्या नौदलाने स्पष्ट केलं आहे. आम्ही या युद्ध सरावाचा उपयोग दोन्ही देशांमधील स्ट्रॅटर्जिक कम्युनिकेशनसाठी करत आहोत, असं नॅशनल मॅरेटाईम फाऊंडेशनचे डायरेक्टर जनरल व्हाइस अ‍ॅडमिरल प्रदीप चौहान यांनी दिली आहे. दोन्ही देशातील युद्ध नौका तेथे युद्धासाठी नाही तर सिग्नलिंगसंदर्भातील सरावासाठी होत्या, असंही चौहान यांनी स्पष्ट केलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India holds naval exercise with Japan amid stand-off with China