CJI Sakal
देश

Supreme Court : सरन्यायाधीशांनी वकिलांना फटकारलं, "आमच्याकाळी झाडाखाली उभं राहून.."

सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांसाठी चेंबर्सचे वाटप भारताच्या सरन्यायाधीशांनी स्थापन केलेल्या समितीद्वारे केले जाते.

सकाळ डिजिटल टीम

CJI On Plea Regarding Chamber Allotments : देशातील वकिलांना चेंबर मिळत नसून, दिल्लीतील वकिलांनी याबाबत स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे, असे मत देशाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी आपण वकील असताना झाडांखाली उभे राहत होतो. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला चेंबर्स मिळाले आहेत. त्यामुळे दिल्लीतील वकिलांना मिळणाऱ्या चेंबरबाबत स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयातील वकिलांसाठी चेंबर्स वाटप करण्याबाबत याचिकेवर रमणा यांनी वरील मत व्यक्त केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांसाठी चेंबर्सचे वाटप भारताच्या सरन्यायाधीशांनी स्थापन केलेल्या समितीद्वारे केले जाते आणि या वाटपाला CJI ची मान्यता घ्यावी लागते.या आठवड्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय शाखेने 468 वकिलांची यादी प्रकाशित केली ज्यांना चेंबरचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, याच संदर्भातील चेंबर वाटपासाठी वकिलांच्या नावांची यादी त्वरीत सूचीबद्ध करण्याबाबतची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर बोलताना सरन्यायाधीशांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत वकील विधान केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी CJI म्हणून बोलत नसून, वकिलांच्या हिताबद्दल बोलत असून, राजवाड्याची अपेक्षा करू नका. बसायला जागा मिळणे हीच मोठी गोष्ट असून, दिल्ली वगळता देशात कुठेच वकिलांना चेंबर्स मिळत नाही आम्ही झाडाखाली उभे राहायचो. तुम्हाला चेंबर्स मिळाले आहेत त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. चेंबर वाटपासाठी वाटप समितीला अंतिम यादी करण्यासाठी बराच वेळ लागला. मात्र, यामध्ये आता सुमारे 400 ते 500 लोकांना लाभ मिळाला आहे असे असताना तुम्हाला यावर आक्षेप का? असा प्रश्नदेखील रमणा यांनी वकिलांना विचारला. त्यानंतर पुढील आठवड्यात खंडपीठासमोर याबाबतची यादी देण्याचे मान्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : अनंत अंबानी यांनी छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामला भेट दिली

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT