देश

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या राजकारणात ट्विस्ट; ममता बॅनर्जींनी घेतली 'या' भाजप नेत्याची भेट

संतोष कानडे

West Bengal Politics : पश्चिम बंगालच्या राजकारणात मंगळवारी एक ट्विस्ट बघायला मिळाला. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी भारतीय जनता पक्षाच्या खासदाराची भेट घेतली. स्वतः ममता ह्या भाजप नेत्याच्या निवासस्थानी पोहोचल्या आणि दीर्घ चर्चा केली.

भाजपचे राज्यसभा सदस्य अनंत राय महाराज यांनी आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं स्वागत केलं. दोघांच्या भेटीमुळे पश्चिम बंगालमधलं राजकारण तापलं आहे. अनंत राय महाराज हे उत्तर बंगालच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ आहे.

भाजपने उत्तर बंगालमध्ये मागच्या काही वर्षांपासून ताकदीने पावलं रोवण्यास सुरुवात केली आहे. उत्तर बंगालमधील कूचबिहारला पृथक ग्रेटर कूच बिहार राज्य म्हणून घोषित करणाऱ्या संघटनेते अनंत राय हे अध्यक्ष आहेत.

स्वतःला ग्रेटर कूचबिहारचे महाराज म्हणवणारे अनंत यांना भाजपने एका वर्षापूर्वीच पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठवलं होतं. आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निवासस्थानी जात चर्चा केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागच्या सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले निशिथ प्रमाणिक हे अनंत यांच्या जवळचे समजले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

SCROLL FOR NEXT