Mahayuti: विधानसभेपूर्वी महायुतीत स्फोट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर करण्याची सेना-भाजप नेत्यांची मागणी?

Ajit Pawar: महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत महायुतीचा धुव्वा उडवला. यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत वाद उफाळत आहे.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis
Ajit Pawar Eknath Shinde Devendra FadnavisEsakal
Updated on

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीच्या माध्यामातून एकत्र लढवली होती.

यामध्ये महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत महायुतीचा धुव्वा उडवला. यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत वाद उफाळत असून, अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये नको अशी मागणी सेना-भाजप नेते करत असल्याची माहिती सूत्रांनी दिल्याची बातमी साम टीव्हीवर प्रसिद्ध झाली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये ठेवण्याच्या बाबतीत पुनर्विचार करावा अशी मागणी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे दिली आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाची मते भाजप उमेदवारांना मिळाली नसल्याचा आरोप हे नेते करत आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत जिथे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत, तिथे सेना-भाजपचे उमेदवार पिछाडीवर राहिल्याचे हे नेते म्हणत आहेत. त्यामुळे आता महायुतीत तिसऱ्या पक्षाची गरज काय असे हे नेते म्हणत असल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis
Biennial Vidhan Parishad Election: द्विवार्षिक विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर; 12 जुलैला मतदान अन् मतमोजणी

दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, "माढा, सोलापूर आणि दिंडोरीमध्ये आमच्या आमदारांनी काम केले आहे."

या सर्व घडामोडीत अजित पवार यांच्या पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पक्षात नाराज असून, ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर भुजबळ यांनी पक्ष सोडला तर राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का बसू शकतो.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis
कार्यकर्त्याने पाय धुतलेच नाहीत; व्हिडिओवरून वाद निर्माण झाल्यानंतर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यांनी 13 जागी विजय मिळवला. यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी 9 जागा जिंकल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अवघ्या 10 जागा लढवत 8 जगांवर विजय मिळवला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागांवर यश मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com