Congress President Election Sonia Gandhi KC Venugopal esakal
देश

Congress : अध्यक्षपदाची चर्चा सुरु असतानाच सोनिया गांधींचं 'या' बड्या नेत्याला दिल्लीत बोलावणं

काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचा पुढील अध्यक्ष (Congress President Election) कोण होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या पदासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi), अशोक गेहलोत आणि शशी थरूर यांची नावं चर्चेत आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांना तातडीनं दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी वेणुगोपाल यांना दिल्लीत बोलावलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेल्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) केसी वेणुगोपाल सहभागी आहेत. सध्या हा प्रवास केरळमधून होत आहे. मात्र, प्रवासादरम्यान केसी वेणुगोपाल यांना दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी वेणुगोपाल यांना राजधानीत बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

शशी थरूर उमेदवारीची घोषणा करू शकतात

यापूर्वी काँग्रेस नेते शशी थरूर (Congress leader Shashi Tharoor) यांनी सोमवारी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. पक्षाध्यक्षपदासाठी आगामी निवडणूक लढवण्यास सोनिया गांधींनी थरूर यांना मान्यता दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. थरूर लवकरच त्यांच्या उमेदवारीची घोषणाही करू शकतात.

राहुल गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी

दरम्यान, अनेक राज्यांमध्ये राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष करण्याची मागणी होत आहे. काँग्रेसच्या सात राज्यांमध्ये राहुल गांधींना अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र, बिहार, जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडू काँग्रेस युनिटनं हा ठराव मंजूर केला आहे. तत्पूर्वी, राजस्थान, गुजरात आणि छत्तीसगडच्या काँग्रेस युनिटनं रविवारी या संदर्भात ठराव मंजूर केला होता. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 23 सप्टेंबर रोजी जारी होणार आहे. तर, 17 ऑक्टोबर रोजी निवडणुका होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules September 2026 : एलपीजी ग्राहकांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरचे ‘हे’ ५ नियम बदलणार

Hirakani Tigress Latest Update : सह्याद्रीच्या जंगलात 'हिरकणी'चा मुक्त वावर! चिपळूणच्या डोंगरात 2 महिने मुक्काम; वन विभागाचे जीपीएसवर लक्ष

Nepal Flood Rescue: मृत्यू दिसत होता; तरी धैर्य सोडले नाही!; नेपाळमधील मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतलेल्या भाविकांचे थरारक अनुभव

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

NEET PG Exam 2026: नीट-पीजीचा पेपर गेला बरा जिल्ह्यातील चार केंद्रांवर परीक्षा; एक हजार परीक्षार्थी

SCROLL FOR NEXT