माझ्यामागं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची ताकद, मी कोणालाच घाबरत नाही : आमदार शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Shinde Gram Panchayat Election

खेड ग्रामपंचायतीत तीन आमदार आणि दोन खासदारांची ताकद आमच्या विरोधात होती; पण..

माझ्यामागं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची ताकद, मी कोणालाच घाबरत नाही : आमदार शिंदे

सातारा : खेड ग्रामपंचायतीत तीन आमदार आणि दोन खासदार यांची ताकद आमच्या विरोधात होती; पण माझ्यामागं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची ताकद आहे. त्यामुळं मी कोणाला घाबरत नाही, असा इशारा आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी दिला.

खेड ग्रामपंचायतीत (Khed Gram Panchayat Election) आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलनं सत्तांतर केलं. त्यानंतर आमदार शिंदे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, 'माझ्या मतदारसंघातील चार ग्रामपंचायतींच्या आज निवडणुका होत्या. त्यामध्ये यापूर्वी त्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होत्या. त्यातील खेड ग्रामपंचायतीमध्ये येथील जनतेनं आम्हाला निवडून दिलं आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास दिसत असल्यानं या ग्रामपंचायतीमध्ये यश मिळत आहे.'

हेही वाचा: Goa Politics : राजकीय समीकरण बदलणार; 'गोवा फॉरवर्ड'चे लवकरच काँग्रेसमध्ये विलिनीकरण!

'चुकीच्या शक्तीचा पराभव होणारच'

तसं पाहिलं तर खेड ग्रामपंचायतीत विरोधकांकडं तीन आमदार आणि दोन खासदारांची ताकद होती; पण माझ्यामागं मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ताकद आहे. त्यामुळं मी कोणाला घाबरत नाही. राज्यातील प्रत्येक सामान्य माणूस शिंदे गट शिवसेना व भाजप सरकारच्या या विकासाच्या मागं उभी आहे. त्यामुळं यापुढं चुकीच्या शक्तीचा पराभव हा होणारच आहे.’’ दोन खासदार म्हणजे एक साताऱ्याचे श्रीनिवास पाटील आणि दुसरे अमोल कोल्हे असे शिंदे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: Police : तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल; पोलीस कर्मचारी निलंबित

Web Title: Eknath Shinde Devendra Fadnavis Strength Behind Me I Am Not Afraid Of Anyone Mla Mahesh Shinde At Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..