saurav ganguly. 
देश

दादाच्या आजारपणाचा कंपनीला धसका; जाहिरात घेतली मागे

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष (BCCI) सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर अदानी विलमार कंपनीने गांगुली यांच्या सर्व जाहिराती मागे घेतल्या आहेत. सौरव गांगुली यांनी फॉर्च्यून राईस ब्रॅन कुकिंग ऑईलची जाहीरात केली होते. आता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने कंपनीने त्यांची जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजी कर्णधाराच्या सर्व जाहिराती मागे घेण्यात आल्या आहेत. तसेच जाहिरातीसाठी नवे कॅम्पेन तयार करण्याच्या सूचना त्यांच्या जाहिरात एजेंसीला देण्यात आल्या आहेत. सौरव गांगुली कौलकातामधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. 

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरुच, एका दिवसात दीड लाखांहून अधिक रुग्ण

क्रिकेटमधील दादा अर्थात सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सौरव गांगुली यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

48 वर्षीय सौरव गांगुली यांना योग्य वेळी सर्वोत्तम उपचार देण्यात आले. आणखी दोन कोरोनरी आर्टरीला अवरोध (Block) असल्याने अ‍ॅन्जिओग्राफीची आवश्यकता आहे. पण यासंदर्भातील निर्णय तात्काळ घेण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पुढील दोन-तीन दिवसांत गांगुली यांना डिस्चार्ज दिला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

Bird Flu: केरळमध्ये 'बर्ड फ्लू'ची साथ; राजस्थान, मध्य प्रदेश,...

शनिवारी जीममध्ये व्यायाम करत असताना सौरव गांगुली यांच्या छातीत दुखायला लागले. त्यामुळे त्यांना कोलकाता येथील वूडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी देखील करण्यात आली होती. गांगुली यांच्यासोबत त्यांची पत्नी डोना गांगुली आणि भाऊ स्नेहाशीष आहेत. आयपीएल 2020 स्पर्धेपासून सौरव गांगुली कामात व्यस्त होते. क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसह राजकीय आणि इतर क्षेत्रातील  अनेक दिग्गज मंडळी गांगुलींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT