covaccin trial in last phase 
देश

कोव्हॅक्सिन अंतिम टप्प्यात; चाचण्यांचा प्रस्ताव ‘एम्स’कडून तयार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ८१ लाखांवर पोचली असतानाच प्रतिबंधक लशीच्या पुढील टप्प्यांतील चाचण्यांचे प्रयत्नही वेगवान झाले आहेत. भारत बायोटेककडून विकसित केल्या जाणाऱ्या कोव्हॅक्सीन या लशीच्या तिसऱ्या टप्प्यांतील चाचण्यांना मान्यता मिळविण्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) माध्यमातून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर आरोग्य नियंत्रक यंत्रणेकडे सादर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर यासंदर्भातील लस लवकरात लवकर विकसित करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. त्यापुढे जाऊन लशीच्या वितरणासाठी राज्यस्तरावर समित्या नेमण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. मात्र लशीच्या वितरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्राची असेल. त्यामुळे राज्यांवर त्याची जबाबदारी टाकता येणार नाही, असा इशारा माकप पॉलिट ब्यूरोने दिला आहे.

नियम पाळावे लागणार
देशात तिन्ही लशींच्या परिक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही त्यामुळे लस येत नाही तोवर आरोग्य नियमांचे काटेकोर पालन आवश्‍यक असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या एम्समध्ये पुढील आठवड्यातच सुरू व्हाव्यात यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. एम्सच्या विशेषज्ञ समितीसमोर या लशीचे सादरीकरण करण्यास परवानगी मागण्यात आली आहे. हा प्रस्ताव देशाच्या औषध नियंत्रकांसमोर सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मास्क न लावणाऱ्यांना चाप
कोरोनाचा धोका कायम असतानाच मास्क न घालता किंवा तो खिशात ठेवून बाहेर फिरणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. मास्क अजिबात न वापरणे किंवा तो व्यवस्थित न घालणे हे देखील गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये येते. मास्क न वापरणारे स्वतःबरोबर समाजाचा जीवही धोक्‍यात टाकतात. त्यामुळे अशांना किमान ५०० रुपये दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे. दिल्लीत मास्कविना बेजबाबदारपणे बाहेर हिंडणाऱ्यांवर शोधून दंडात्मक कारवाई करण्यासाठी राज्य सरकार फिरत्या दक्षता पथकांची संख्या वाढविणार असल्याचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.

‘जॉन्सन’च्या तरुणांवर चाचण्या
जॉन्सन अँड जॉन्सन ही कंपनी देखील कोरोनावरील तिच्या लशीच्या बारा ते अठरा वर्षे वयोगटातील तरुणांवर चाचण्या घेण्याच्या विचारात आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (सीडीसी) बैठकीमध्ये कंपनीच्या कार्यकारी प्रमुखांनीच ही माहिती दिली. लहान मुलांवर देखील चाचण्या घेण्याचा आमचा विचार आहे पण हे करताना सर्व नियम पाळले जातील असे कंपनीकडून जाहीर करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT