crime news in delhi Sakal
देश

अमेरिकन तरुणीच्या अपहरणाचा २४ तासांत छडा, कहाणी ऐकून दिल्ली पोलिस आवाक्

नवी दिल्ली पोलिसांनी हायटेक पद्धतीने या घटनेचा तपास करत २४ तासांत तरुणीची सुखरूप सुटका केलीये

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली पोलिसांनी हायटेक पद्धतीने या घटनेचा तपास करत २४ तासांत तरुणीची सुखरूप सुटका केलीये

नवी दिल्लीतून अपहरणाची एक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे स्थानिक पोलिस तसेच अमेरिकन दूतावासाने आर्श्चय व्यक्त केलं आहे. दिल्लीतील चाणक्यपुरी पोलिस स्टेशन मध्ये अमेरिकन दूतावासाने नुकत्याच एका 23 वर्षीय अमेरिकन तरुणीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, नवी दिल्ली पोलिसांनी हायटेक पद्धतीने या घटनेचा तपास करत २४ तासांत तरुणीची सुखरूप सुटका केली आहे. दरम्यान, या अपहरणाच्या या प्रकरणात अनेक खुलासे झाले असून वरिष्ठांना धक्का बसला आहे.. काय आहे अपहरणाची संपूर्ण कहाणी?

क्लो रेनी नावाची एक अमेरिकन तरुणी 3 मे रोजी दिल्लीत आली होती. देशातील अनेक भागात पर्यटनाच्या हेतुने ही तरुणी प्रदेशांमध्ये फिरली. दरम्यान, 9 जुलै रोजी या तरुणीने एका पुरुषाने तिच्यावर हल्ला केल्याचे आणि शारीरिक शोषण केल्याचे यूएस सिव्हिल सर्व्हिसला मेल करून कळवले. यानंतर, तरुणीने 10 जुलै रोजी व्हिडिओ कॉल करून आपल्या आईला घडलेली घटना सांगितली.

याप्रकरणी आईने अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता. एका तरुणाने तो व्हिडिओ कॉल कट केला. यानंतर त्या तरुणीच्या आईने अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. दरम्यान, अमेरिकन दूतावासाने 15 जुलै रोजी चाणक्यपुरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

अपहरण केलेले लोकेशन ट्रेस करण्यासाठी यूएस सिटिझन सर्व्हिसेसला ईमेल पाठवला होता. तरुणीने वापरलेला तो आयपी अॅड्रेस मिळवण्यासाठी पोलिसांनी Yahoo.com ची मदत घेतली. सोबत दिल्ली पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून तिचा इमिग्रेशन फॉर्मही मागितला. यात तरुणीने तिचा राहत असलेला दिल्लीतील पत्ता दिला होता.

पोलिसांना तपास केल्यानंतर तो पत्ता रेडिसन ब्लू हॉटेलचा असल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता, त्या पीडितेने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करताना कोणाचातरी वाय-फाय डेटा घेतला असल्याते निष्पण्ण झाले. दरम्यान, पोलिसांनी आयपी अॅड्रेसशी लिंक केलेला मोबाइल नंबर आणि कॉमन अॅप्लिकेशन फॉर्म (सीएएफ) मध्ये दिलेला पर्यायी मोबाइल नंबर तपासला. यानंतर तरुणी वापरत असलेल्या व्हॉट्सअॅप नंबरचा आयपी अॅड्रेस ट्रेस करण्यात आला.

तपासाआधारे पोलिसांनी 31 वर्षीय नायजेरियन तरुण ओकोरोफोर चिबुईके ओकोरो उर्फ ​​रेची याला गुरुग्राममधून पकडले. या मोबाइलचा आयपी अॅड्रेस वापरून मुलीने तिच्या आईला व्हॉट्सअॅप कॉल केला होता. पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली असता, ती संबंधित तरुणी ग्रेटर नोएडा येथील इम्पेरिया रेसिडेन्सी येथे राहत असल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे पोहोचून मुलीला शोधून काढले. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता, तरुणीने सांगितले की, आपल्या आई-वडिलांना इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी तिने स्वतःचे अपहरण केल्याची खोटी कहाणी रचली होती.

दरम्यान, पोलिसांना तपासात समोर आले की, त्या तरुणाचा व्हिसा गेल्या महिन्यात ६ जून रोजी संपला आहे. या दोघांची फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती आणि ती भारतात आल्यानंतर त्याच्यासोबत राहत होती. त्यामुळे आता वैध पासपोर्ट आणि वैध व्हिसाशिवाय भारतात दीर्घकाळ राहिल्याबद्दल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT