Pune Crime News 
देश

Crime News: दिल्ली हादरली! दोन लहान मुलींसमोरच साजिदने केला पत्नीचा खून

सकाळ डिजिटल टीम

Crime News: देशाची राजधानी दिल्ली येथे एका खुनामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी एका पतीने आपल्या पत्नीचा खून केला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावेळी रागाच्या भरात हा खून करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, दिल्लीतील एका भागात पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केला. आरोपीनी महिलेवर अनेक वेळा हल्ला केला. घटनेच्या वेळी घरात दोन मुली देखील हजर होत्या. एका मुलीने तिच्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ही जखमी झाली.

साजिद असे आरोपीचे नाव असून त्याला ११ आणि ७ वर्षाच्या दोन मुली आहेत. साजिदचा आपल्या पत्नीवर संशय होता. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक चाकू जप्त केला आहे.

मृत पत्नीचे नाव निशा आहे. पती साजिद याने महिलेला मानेवर छातीवर हातावरच अनेक वार केले. त्यानंतर गुरुतेग बहादूर रुग्णालयात नेले. तिला त्या ठिकाणी मृत घोषित करण्यात आले

पती शाहिद विरुद्ध कलम 302 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजिदला अटक करण्यात आली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT