देश

CRPF कॉन्स्टेबलने एसआयवर चालवली गोळी; हत्येनंतर स्वत:वरही झाडली गोळी

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद: हैदराबादमधील मुलुगु जिल्ह्यातील वेंकटपुरम गावामध्ये आज रविवारी एक विचित्र घटना घडली आहे. सीआरपीएफ हेड कॉन्स्टेबलने (CRPF Head Constable) एसआयलाच गोळी मारुन त्याची हत्या केली आहे. इतकंच नव्हे तर त्यानंतर त्याने स्वत:लाही गोळी मारली आहे. जखमी अवस्थेतील या आरोपी हेड कॉन्स्टेबलला सध्या दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलं आहे.

ही घटना सीआरपीएफ कॅम्पमध्ये घडली असून या घटनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे. जवानांनी या घटनेची माहिती त्वरित आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. हेड कॉन्स्टेबलने चालवलेल्या गोळीमुळे एसआयचा जागीच मृत्यू झाला आहे. (Central Reserve Police Force)

मात्र, अद्याप या घटनेमागचं कारण स्पष्ट झालं नाहीये. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. सोबतच पोलिस याचा देखील तपास करत आहेत की, दोघांच्या दरम्यान आधीपासूनच कोणता वाद अथवा भांडण होतं का? या प्रश्नाच्या उत्तरानंतर या घटनेमागचं कारण सुस्पष्ट होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT