मुलांना कोणती लस देणार? नोंदणी कशी होईल? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर!

vaccine for child  child vaccination
vaccine for child child vaccination

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याची घोषणा केली. यासाठी आजपासून नोंदणी सुरू होत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय पातळीवर मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पण पंतप्रधानांच्या घोषणेनंतर पालकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. उदाहरणार्थ, मुलांना कोणती लस मिळेल? नोंदणी कशी होईल? लसीमध्ये तीन महिन्यांचे अंतर असेल, तर ते परीक्षा कशी देणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात मिळतील. (Child Vaccination)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संबोधनात लशीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. DCGI ने लहान मुलांसाठी Covaxin लस मंजूर केली आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणाही झाली आहे. लस 15 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांला आपत्कालीन परिस्थितीत देण्यात येणार आहे. यापेक्षा परिस्थीत खालवल्यास 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही लसीकरणाचा फायदा मिळू शकतो. मुलांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारकडून भारत बायोटेकला ऑर्डर देण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. येत्या 3 जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे. (OM Modi declared vaccination for Children)

मुलांची नोंदणी कशी करावी?

सध्या देशातील ऑनलाईन प्रणालीनुसार कोविन अॅपवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर स्लॉट उपलब्ध होतो. सध्या मुलांच्या लसीकरणाबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. अॅपवर स्लॉट बुकिंग करताना आधार कार्ड क्रमांक द्यावा लागेल. अनेक मुलांकडे आधआर कार्ड नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र केंद्र केलं जाण्याची शक्यता आहे.

देशातील अनेक लोक खेडोपाडी, घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचं त्यांच्या घरातच लसीकरण करण्यात येऊ शकतं. सध्या जी मुलं शाळेत जात आहेत, त्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाऊ शकतं. यामुळे मुलं संसर्गाच्या धोक्यापासून दूर राहतील.

लसीकरणात ९० दिवसांचा फरक असेल, तर मुलं परीक्षा कशी देणार?

१८ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणात ९० दिवसांचं अंतर ठेवण्यात आलं होतं. मधल्या काळात ते कमी झालं. आता ३ जानेवारीपासून बालकांचं लसीकरण सुरू होत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर मुलांनी मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा दिली, तर त्यांच्या दुसऱ्या डोसची तारीख जवळ आली असेल आणि एक डोस घेतला, तरी त्यांना संसर्गापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकते.

मुलांसाठी लशीची किंमत किती असेल?

सध्या देशात मोफत व ठराविक रक्कम देऊन लसीकरण करण्याची पद्धत आहे. काही लोक शासनाने उभारलेल्या केंद्रांवर जाऊन लस घेत आहेत. तर काही लोक खासगी रुग्णालयात पैसे भरून लस घेत आहेत. अशा स्थितीत मुलांसाठीही दोन्ही व्यवस्था असण्याची शक्यता आहे.

बूस्टर डोस आणि प्रतिबंधात्मक लस म्हणजे काय?

बूस्टर डोसवर (Booster Dose) अद्याप विचारमंथन सुरू आहे. 25 डिसेंबरच्या संध्याकाळी देशाला संबोधित करताना, पीएम मोदींनी 'बूस्टर डोस' ऐवजी प्रतिबंधात्मक लस असा शब्द वापरला. आता प्रश्न असा आहे की, हे दोघे एकच की वेगळे आहेत. पंतप्रधानांच्या भाषणानंतर काहींना प्रश्न पडला होता. रोग प्रतिकारशक्ती वाढवणे हा या डोसचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या दोन्हीत नावाचा फरक आहे.

लहान मुलांच्या लस आणि वृद्धांच्या बूस्टर डोसबद्दल पंतप्रधान काय म्हणाले?

येत्या 3 जानेवारीपासून लहान मुलांचं लसीकरण सुरू होणार आहे. लस दिल्यानंतर शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कोरोनापासून संरक्षण मिळणार आहे. 15 ते 18 वयोगटातील बालकांच्या लसीकरणामुळे इयत्ता 10वी-12वीचे विद्यार्थी चिंता न करता परीक्षा देऊ शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com