esakal
देश

संरक्षण निर्यातीत भारताचा नवा विक्रम, वर्षभरात 13 हजार कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे निर्यात

देशाचे संरक्षण क्षेत्रही निर्यातीच्या क्षेत्रात हळूहळू पुढे जात आहे.

धनश्री ओतारी

भारत आता अनेक क्षेत्रात स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत आहे. अशी अनेक उत्पादने आहेत , जी आयात केली गेली होती,परंतु आता देशातच तयार केली जात आहेत. देशाचे संरक्षण क्षेत्रही निर्यातीच्या क्षेत्रात हळूहळू पुढे जात आहे. एका वर्षात भारताने संरक्षण निर्यात क्षेत्रात १३ हजार कोटी रुपयांचा आकडा गाठला. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 54.1 टक्के वाढ झाली आहे. (Defence export by India in 2021 22 touches record high)

विशेष म्हणजे एकूण निर्यातीपैकी 70 टक्के निर्यात खाजगी कंपनींची आहे, तर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून केवळ 30 टक्के निर्यातच होऊ शकली. संरक्षण उत्पादन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय जाजू यांच्या मते, देशाची संरक्षण निर्यात प्रामुख्याने अमेरिका, फिलिपाइन्स, दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका या देशांना होते. 2020-21 मध्ये भारताची संरक्षण निर्यात 8 हजार 434 कोटी रुपयांची होती, तर 2019-20 मध्ये ती 9 हजार 115 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

2015-16 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात केवळ 2059 कोटी रुपयांची होती. दुसरीकडे, कोव्हिडमुळे गेली दोन वर्षे हा व्यवहार ठप्प झाला होता. पण यावेळी चांगली प्रगती झाली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने संरक्षण निर्यातीत आठ पटीने वाढ केली आहे.

खासगी कंपनीने ७० टक्के निर्यात करत कमालीचे प्रदर्शन केले आहे. यंदाच्या वर्षी जानेवारीमध्ये भारताने फिलिपाइन्ससोबत जवळपास २७७० कोटी रुपयांची डील केली होती. या डीलअंतर्गत भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राच करार केला होता.

अशातच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोमवारी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एका कार्यक्रमात खाजगी क्षेत्रातील कंपनी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला पुरस्कार प्रदान करणार आहेत.

भारताने निर्यात केलेल्या उत्पादनांमध्ये शस्त्रे, सिम्युलेटर, अश्रू वायू लाँचर्स, टॉरपीडो लोडिंग सिस्टीम,कोस्टल रडार सिस्टीम,अलार्म मॉनिटरिंग आणि कंट्रोल, नाईट व्हिजन मोनोक्युलर आणि द्विनेत्री, हलके वजन टारपीडो, आर्मर्ड व्हेइकल, सिक्युरिटी व्हेइकल, रडार, एचएफ रेडिओ, शस्त्र ट्रॅकर्स यांचा समावेश आहे.

सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की संरक्षण उत्पादने भारतातून 75 देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. मात्र, सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव या देशांची नावे सार्वजनिक करण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT