Defence Minister Rajnath Singh met families of civilians killed in Jammu and Kashmir Poonch district 
देश

जम्मू-काश्मीरमधील मृत नागरिकांच्या कुटुंबियांची राजनाथ सिंहांनी घेतली भेट, जखमींची केली विचारपूस

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यामध्ये तीन नागरिकांची हत्या झाली होती. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मृत नागरिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.

कार्तिक पुजारी

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यामध्ये तीन नागरिकांची हत्या झाली होती. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मृत नागरिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. तसेच जखमींची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूल केली. राजनाथ सिंह सुरक्षा स्थितीची पाहणी करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेले आहेत. यावेळी त्यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. (Defence Minister Rajnath Singh met families of civilians killed in Jammu and Kashmir Poonch district)

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर हल्ला झाला होता. ज्यात चार जवान शहीद झाले होते तर दोनजण जखमी झाले होते. त्यानंतर लष्कराकडून आठ स्थानिक नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यातील तीन जणांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. तर इतर पाच जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी लष्कराने तपास सुरु केला आहे.

राजनाथ सिंह यांनी बुधवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी नागरिकांची विचारपूस केली. तसेच मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली. लष्कर प्रमुख मनोज पांडे हे देखील राजोरी जिल्ह्यात पोहोचले आहेत. त्यांनी देखील सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी नागरिकांची विचारपूस केली.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन राजनाथ सिंग यांनी दिले असल्याची माहिती, शेहनाझ घनाई यांनी दिलीये. राजनाथ सिंह सकाळी म्हणाले होते, की लष्कराने देशाचे रक्षण करण्याबरोबरच लोकांचे मनं जिंकण्याचे काम करावे आणि अशा प्रकारची चूक पुन्हा करु नये.

दरम्यान, तीन नागरिकांच्या संशयास्पद मृत्यूनंतर लष्कराने याची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच एका ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. तसेच तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: दुधासाठी चिमुकला रडला, दारुड्या बापाचा संताप पेटला, रागात मुलाला अमानुष मारहाण, दरवाजावर धाडकन आपटलं अन्...; मुंबईत खळबळ

अभिषेक बॅनर्जींनंतर TMCच्या खासदाराला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत; भाजप म्हणते हे नाटक

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mahadev Temple Kagal : कोल्हापुरात पोर्णिमेच्या रात्री महादेव मंदिरातील पिंडीवर रक्ताची धार, अघोरी प्रकाराचा कळस, ग्रामस्थांकडून तीव्र निषेध

SCROLL FOR NEXT