Delhi AIIMS Esakal
देश

Delhi AIIMS : दिल्ली एम्सने घेतला यू-टर्न! 22 जानेवारीला अर्धा दिवस ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मागे

Delhi AIIMS : केंद्र सरकारमार्फत चालवल्या जाणाऱ्या चार रुग्णालयांनी 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी दुपारी 2.30 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीस्थित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आता सोमवारीही सुरू राहणार आहे. अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रसंगी सोमवार, 22 जानेवारी रोजी अर्धा दिवस ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय एम्स प्रशासनाने मागे घेतला आहे. आता रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवसभर ओपीडी सुरू राहणार आहे. एम्सचे प्रशासकीय अधिकारी राजेश कुमार यांनी रविवारी या संदर्भात जारी केलेल्या नवीन कार्यालयाच्या मेमोमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी शनिवारी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीतील एम्स आणि दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयासह केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी चारही रुग्णालये 22 जानेवारीला दुपारी 2.30 वाजेपर्यंत बंद राहतील, असे सांगण्यात आले होते. . मात्र, या काळात आपत्कालीन सेवा सुरू राहणार होती.

वृत्तसंस्थाच्या वृत्तानुसार, राजधानी दिल्लीतील एम्सच्या अधिकृत सूचनेनुसार, केंद्र सरकारने 22 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली होती. त्यात म्हटले आहे की, “सर्व कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी कळविण्यात येते की, 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत संस्था अर्धा दिवस बंद राहणार आहे. सर्व विभाग प्रमुखांना आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी.'' त्यात पुढे ''...सर्व आपत्कालीन वैद्यकीय सेवा चालू राहतील.'' असे म्हटले होते.

एम्सच्या अधिकाऱ्याने सांगितले होते की, रुग्णांना दिलेला वेळ पुन्हा शेड्यूल केला जात आहे. जर कोणी रुग्ण आला तर आम्ही त्यावर उपचार करू. मात्र, सायंकाळची ओपीडी सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Latest Marathi News Live Update : नवजात बाळाचा मृत्यूनंतर काही दिवसांतच मातेचाही मृत्यू

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

SCROLL FOR NEXT